Jai Jai Maharashtra Majha: "जय जय महाराष्ट्र माझा" राज्यगीत म्हणताना लक्षात ठेवा हे नियम

Jai Jai Maharashtra Majha Rajyageet: "जय जय महाराष्ट्र माझा" राज्यगीतासाठी मार्गदर्शन सूचना जारी.

Guildlines issued for National Anthem "Jai Jai Maharashtra Maja"
Guildlines issued for National Anthem "Jai Jai Maharashtra Maja"SAAM TV
Published On

>> सुशांत सावंत

Jai Jai Maharashtra Majha Rajyageet Guildlines : राज्य सरकारने नुकताच 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार केला आहे. त्यामुळे आता प्रत्येक सरकारी आणि सामाजिक कार्यक्रमात राष्ट्रगीताप्रमाणे आपल्याला हे राज्यगीत देखील ऐकायला मिळणार आहे.

या गीताला राज्यगीताचा दर्जा दिल्याने त्याचा कुठेही अपमान होऊ नये आणि मान राखला जावा यासाठी राज्य सरकारकडून काही नियम देखील घालून दिले आहेत. राज्य सरकारने "जय जय महाराष्ट्र माझा" राज्यगीतासाठी मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.


Guildlines issued for National Anthem "Jai Jai Maharashtra Maja"
Graduate Constituency Election Result : कोण मारणार बाजी? विधानपरिषदेच्या पाच जागांचा आज फैसला, अनेकांची प्रतिष्ठा पणाला

राज्यगीतासाठी मार्गदर्शक सूचना

- राज्यगीत १ मिनिट ४१ सेकंदात वाजवता किंवा गाता येईल.

- १९ फेब्रुवारी २०२३ पासून "जय जय महाराष्ट्र माझा" गीत राज्यगीत म्हणून स्वीकारले जाईल.

- १ मे रोजी महाराष्ट्र दिनी राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजवले जाणार.

- राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रगीतासह राज्यगीतही वाजवले व गायले जाणार.

- राज्यगीत सुरु असताना सावधान स्थितीत उभे राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,आजारी व दिव्यांग नागरिकांना उभे राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.

- शालेय पुस्तकांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यगीताचा समावेश करण्यात येणार आहे.


Guildlines issued for National Anthem "Jai Jai Maharashtra Maja"
Election Result Live Updates : कोकणची जागा आम्ही जिंकलो, बऱ्याच काळानंतर आम्ही विजय मिळवला - देवेंद्र फडणवीस

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून 2023 पासून या राज्यगीताचा स्वीकार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राचे गौरव गीत अशी या गीताची ओळख आहे. राज्याच्या सीमा आंदोलनाच्या काळात आणि महाराष्ट्र मुक्तीच्या संग्रामात हे गीत अतिशय लोकप्रिय झाले होते. कवी राजा बढे यांनी हे गीत लिहिलं असून श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिले आहे, तर शाहिर साबळे यांनी त्याच्या स्वरांनी या गीतात मराठीजणांच्या भावना गुंफल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com