पंकजा मुंडे अजूनही नाराजच? (पहा व्हिडिओ)

आज गोपीनाथ गडावरुन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. मात्र, त्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वरूप कसे आहे, हे मला माहीत नसल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या नाराजीबाबत अंगुलीनिर्देश केलाच
- पंकजा मुंडे अद्यापही नाराज
- पंकजा मुंडे अद्यापही नाराज- Saam Tv
Published On

भाजपच्या BJP ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी नाराजी व्यक्त करण्याची आणखी एक संधी सोडलीचं नाही, अशी पुन्हा चर्चा सुरू झालीय. कारण आज गोपीनाथ गडावरुन Gopinath Gadh केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड Bhagwat Karad यांच्या नेतृत्वाखाली जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. मात्र, त्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वरूप कसे आहे, हे मला माहीत नसल्याचं सांगत अप्रत्यक्षरित्या नाराजीबाबत अंगुलीनिर्देश केलाच. Is Pankaja Munde Still Unhappy

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे Preetam Munde यांना मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची होती. सोबतच महाराष्ट्रातील Maharashtra स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकांची मागणीही होती. मात्र ओबीसीचा घटक असलेल्या वंजारी समाजातील आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असलेले डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद मिळाले. मोदी Narendra Modi सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यातील चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असल्याने मुंडे परिवारावर पुन्हा अन्याय झाला अशा भावना महाराष्ट्रभरातून व्यक्त झाल्या.

बीडमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर नाराज पदाधिकाऱ्यांची समजुत काढण्यासाठी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत बोलताना पंकजा यांनी 'माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा' असल्याचे सांगत राज्यातील नेत्यांची नावं घेणं टाळलं होतं, त्याही वेळेस त्यांच्या नाराजीवर चर्चा झाली.

- पंकजा मुंडे अद्यापही नाराज
पंकजा मुंडे म्हणून कार्यकर्त्यांना म्हणाल्या...मुर्ख कुठले! (पहा व्हिडिओ)

मधल्या काळात त्यांची नाराजी दूर झाली असावी असं वाटलं होतं. पण पुन्हा जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने पंकजा मुंडे या नाराज असल्याचं अप्रत्यक्षपणे त्यांनीच दाखवून दिले. साम टीव्ही न्यूजशी बोलताना त्यांनी जन आशीर्वाद यात्रेचा रुट कसा आहे आणि प्रयोजन काय आहे, हे माहीत नसल्याचे सांगितले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे अशा का बोलल्या असा प्रश्न पडलाय. कारण जन आशीर्वाद यात्रेचे नियोजन आठवडाभरापासून सुरू आहे. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहित आहे, मग पंकजा मुंडे यांना मराठवाड्यातील जन आशीर्वाद यात्रेचे स्वरूप कसे आहे हे माहीत का नसावं, हा प्रश्न पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे अजूनही नाराज आहेत, या चर्चेला सुरुवात झालीय.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com