Inspirational Story: हिंगोलीच्या तरुणाचा अनोखा जुगाड! जुन्या ऑटो रिक्षाला बनवलं चहाची टपरी

Inspirational Story oF Hingoli Tea Selling Man: रोज सकाळी चहाच्या टपऱ्यांवर प्रचंड गर्दी दिसते. परंतु या टपऱ्या अतिक्रमण विभाग हटवते. यालाच कंटाळून हिंगोलीच्या एकाने रिक्षातच चहाचं दुकान थाटल आहे.
Inspirational Story
Inspirational StorySaam Tv
Published On

शहरात व्यवसाय करताना पालिकेची सततची अतिक्रमण मोहीम, वाहतूक पोलिसांच्या कठोर नियमांचा त्रास आणि त्यातून व्यवसायात सतत होणारे नुकसान या सगळ्या कटकटीतून एक यशस्वी मार्ग काढत हिंगोली मध्ये एका चहा विक्रेत्याने अनोखे जुगाड बनवत प्रति दिवस सातशे ते आठशे रुपये कमाई सुरू केली आहे. लक्ष्मीकांत राजेश जयस्वाल असे या तरुणाचे नाव आहे.

लक्ष्मीकांत यांनी जुन्या ऑटो रिक्षाला चहाची टपरी बनवत व्यवसायात अपयश आल्याने नैराश्य येणाऱ्या तरुणांपुढे आदर्श ठेवला आहे, लालाजी की चाय या नावाने चहाचे दुकान असलेल्या लक्ष्मीकांत यांच्या चहा टपरीवर क्लासवन अधिकाऱ्यासह मोठे व्यापारी चहाचा आस्वाद घेतात, विशेष म्हणजे व्यवसायाची वेळ संपली की लक्ष्मीकांत आपला चहाचा गाडा ऑटो रिक्षासह घरी घेऊन जातात त्यामुळे त्यांची सुरक्षा देखील होत असल्याचे सांगत, माझ्या या जुगाडू युक्तीमुळे

Inspirational Story
Success Story: एमबीए केलं, बँकेत ऑफिसर म्हणून काम, फुल टाइम नोकरी करत UPSC क्रॅक; IAS स्तुति चरण आहेत तरी कोण?

पालिकेच्या अतिक्रमण मोहिमेतून कायमची सुटका झाल्याचं समाधान ही ते व्यक्त करतात. ही आहे हिंगोली शहरातील लालाजी की चाय दुकान. जुना ऑटो रिक्षा त्यात चहाची टपरी, शुद्ध पिण्याचे पाणी, आणि मस्तपैकी गरमागरम चहा कॉफी हे सगळं सहज उद्यास आलं नाही तर त्यामागे आहे हिंगोली पालिकेने सुरू केलेली फूटपाट वरील व्यापाऱ्यांसाठी सततची अतिक्रमण मोहीम वाहतूक पोलिसांची कठोर नियम, त्याचं झालं असं की, हिंगोली शहरात गेल्या 30 वर्षापासून राजेश जयस्वाल चहा विक्रीचा व्यवसाय करतात. सकाळ झाली की, लाला जी की चाय या दुकानावर ग्राहकांची तोबा गर्दी भरते.

प्रत्येक जण म्हणतो लालाजी मुझे एक चाय देना, एका मिनिटात चहा घेऊन ग्राहक पुढे त्याच्या दैनंदिन कामाला जातो, जाताना लालाजींना क्या चाय बनिती क्या बात है अशी दाद ही देत असतं मात्र पुढच्या काही तासात ग्राहकांच्या समाधानाने लालाजी यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद हा ओट घटकेचा ठरत असे कारण हिंगोली पालिका कोणत्याही क्षणी अतिक्रमण काढायला येत असत आणि लालाजी यांची चहाची दुकान उठवत असत. या सगळ्या प्रकाराला वैतागून लालाजी यांनी अखेर एक नामी शक्कल लढवत हिंगोली पालिकेच्या अतिक्रमण मोहिमेलाच चॅलेंज दिले आहे .

Inspirational Story
Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास, शेवटच्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS अपर्णा रमेश यांचा प्रेरणादायी प्रवास

राजेश यांनी त्यांचा मुलगा लक्ष्मीकांत याला सोबत घेत आधुनिक काळासोबत जगायला शिकत एक जुनी रिक्षा खरेदी करून त्यामध्येच आपले फिरते चहाचे हॉटेल सुरू केले आहे, सकाळी घरून थेट हिंगोली शहरातील गांधी चौक आंबेडकर चौक परिसरात चहा विक्री करून आपले दुकान लालाजी थेट घरी घेऊन जातात, यामुळे त्यांच्या दुकानाची सुरक्षा देखील होते, लालाजी यांच्या चहाच्या दुकानावर हिंगोली शहरातील बडे व्यापारी सुपर क्लास वन अधिकारी असे सगळे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी चहाचा आस्वाद घेतात त्यासोबतच त्यांच्या या जुगाडू युक्तीच कौतुकही करतात, लालाजी यांच्या या युक्तीमुळे नेहमी व्यवसायात नैराश्य येणाऱ्या तरुणांपुढे देखील आदर्श उभा राहिला आहे.

Inspirational Story
Success Story: एमबीए केलं, बँकेत ऑफिसर म्हणून काम, फुल टाइम नोकरी करत UPSC क्रॅक; IAS स्तुति चरण आहेत तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com