Fire on INS Brahmaputra: 'INS ब्रह्मपुत्रा'वर लागलेल्या आगीत नौसैनिकाचा मृत्यू; युद्धनौकाही बुडण्याचा धोका

INS Brahmaputra Caught Fire: रविवारी संध्याकाळी नौदलाच्या डॉकयार्डवर असलेल्या आयएनएस ब्रह्मपुत्राला आग लागली होती. या आगीत सितेंद्र सिंग या नौसेनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून युद्धनौकाही बुडण्याचा धोका आहे.
Fire on INS Brahmaputra: 'INS ब्रह्मपुत्रा'वर लागलेल्या आगीत नौसैनिकाचा मृत्यू; युद्धनौकाही बुडण्याचा धोका
INS BrahmaputraSaam Digital
Published On

आयएनएस ब्रह्मपुत्रा युद्धनौकेवर लागलेल्या आगीत नौसैनिकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. सितेंद्र सिंग असं नौसैनिकाचं नावं असून नौदलाच्या पाणबुड्यांनी आज त्यांचा मृतदेह बाहेर काढला. रविवारी संध्याकाळी नेव्हल डॉकयार्डवर असलेल्या आयएनएस ब्रह्मपुत्राला दुरूस्तीचं काम सुरू असताना आग लागली होती. त्यानंतर ते बेपत्ता होते. दरम्यान आग लागल्यानंतर युद्धनौका समुद्रात बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Fire on INS Brahmaputra: 'INS ब्रह्मपुत्रा'वर लागलेल्या आगीत नौसैनिकाचा मृत्यू; युद्धनौकाही बुडण्याचा धोका
IAS Pooja Khedkar : आई-वडिलांचा घटस्फोट आणि UPSC परीक्षेचा काय आहे संबंध? खरंच आरक्षणाचा लाभ मिळतो का? वाचा सविस्तर

भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या डॉकयार्डमध्ये रविवारी INS ब्रह्मपुत्राला दुरुस्तीदरम्यान आग लागली होती. आगीनंतर सितेंद्र सिंग बेपत्ता होते. सितेंद्र सिंग रिफिट करत असताना Guided Missile फ्रिगेटचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे ते पुन्हा सरळ करणं अशक्य होतं. यात सितेंद्र सिंग अडकल्याची भीती होती. दरम्यान आज दीर्घ मोहीमेनंतर त्यांचा मृतदेह काढण्यात नौदलाला यश आलं. ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी, नौदल प्रमुख (CNS) आणि नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी मंगळवारी नौदल डॉकयार्डला भेट देऊन अपघाताचा आढावा घेतला. त्यांनी वेस्टर्न नेव्हल कमांड आणि नौदल मुख्यालयाला आयएनएस ब्रह्मपुत्रा समुद्रात उतरण्यासाठी सक्षम बनवण्याचे निर्देश दिले. युद्धनौकेचं मोठं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आल्याची माहिती नौदल प्रमुखांना अधिकाऱ्यांनी दिली.

Fire on INS Brahmaputra: 'INS ब्रह्मपुत्रा'वर लागलेल्या आगीत नौसैनिकाचा मृत्यू; युद्धनौकाही बुडण्याचा धोका
SAAM Impact : पुराच्या पाण्यात दामटवली प्रवाशांनी भरलेली बस, ड्रायव्हर सस्पेंड; थरारक VIDEO बघाच!

Guided Missile फ्रिगेट्स प्रकारातील स्वदेशी बनावटीची INS ब्रह्मपुत्रा एप्रिल 2000 मध्ये भारतीय नौदलात दाखल झाली. 3,600 टन वजनाचे ही युद्धनौका 125 मीटर लांब आणि 30 नॉटीक मैल वेगाने जाऊ शकते. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रे, पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम श्रेणीच्या तोफा, पाणबुडीविरोधी रॉकेट, रडार असलेली अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध नौका आहे.

Fire on INS Brahmaputra: 'INS ब्रह्मपुत्रा'वर लागलेल्या आगीत नौसैनिकाचा मृत्यू; युद्धनौकाही बुडण्याचा धोका
Nitish Kumar : महिला आहेस, तुला काय कळतं, कुठून कुठून येतात! नितीश कुमारांची विधानसभेत पुन्हा जीभ घसरली, पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com