नागपूर : दिवाळी काही दिवसांवर आली आहे, त्यामुळे नागरिकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र यंदाची दिवाळी काहीशी महागडी ठरणार आहे. कारण जागतिक मंदीची परिस्थिती, इंधनाचे वाढते दर याची झळ सर्वसामान्यांना सोसवी लागत आहे. इंधन दरवाढीचा भार इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर पडत आहे. आता दिवाळीआधी आणखी एक झटका सर्वसामान्यांना बसला आहे. (Inflation)
डाळिंच्या किमती किती वाढल्या?
दिवाळीच्या पूर्वी डाळीच्या दरात (Pulses Rate) वाढ झाली आहे. तूर डाळीचे भाव गेल्या आठ दिवसात प्रतिकिलो चार ते पाच रुपयांनी वाढले आहेत. तूर डाळ ठोक बाजारात 110 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 125 ते 130 रुपये किलोवर पोहोचली आहे. उडीद डाळ 97 ते 100 रुपये किलोवरुन 105 ते 110 रुपये किलोवर पोहोचली आहे.
दरवाढीचं कारण काय?
यंदा अनेक भागात पावसाचं प्रमाण जास्त आहे. अतिवृष्टीमुळे डाळवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर होणार असून त्यात घट होणार आहे. उत्पादन घटण्याच्या शक्यतेने डाळीच्या दरवाढीस सुरुवात झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.