Indurikar Maharaj : आता कंटाळलो! इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार, म्हणाले..'मला घोडे लावा, पण मुलीच्या कपड्यांवर...'

Indurikar Maharaj to Quit Kirtan : सोशल मीडियावर टीकेचा भडिमार झाल्यानंतर इंदुरीकर महाराज व्यथित झाले आहेत. मुलीच्या साखरपुड्याच्या व्हिडिओवरून टीका होत असल्याने त्यांनी दोन-तीन दिवसांत कीर्तन थांबवण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
Indurikar Maharaj to Quit Kirtan
Indurikar Maharaj to Quit KirtanSaam TV Marathi
Published On
Summary
  • सततच्या ट्रोलिंगमुळे व्यथित होऊन इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सोडण्याचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली.

  • “माझ्या मुलीचा काय दोष? ३१ वर्ष झाली, आता बास झालं,” असा भावनिक सूर त्यांनी काढला.

  • दोन-तीन दिवसांत कीर्तन थांबवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी व्हिडिओत सांगितले.

Indurikar Maharaj daughter engagement controversy : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगरमधील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यामुळे व्यथित झालेले इंदुरीकर महाराजयांनी कीर्तन सोडण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्याबाबतचा एक व्हिडओ सोध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं जगावं, असे कमेंट करणारे लोक बोलायला लागलेत. २-३ दिवसात कीर्तन थांबवण्याचा निर्णय घेणार आहे. त्याबाबत विचार सुरू असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणालेत.

मला घोडे लावा, माझा पिंड गेला.. पण माझ्या मुलीचा यात काय दोष आहे? ३१ वर्षे झाली, आता बास झालं. थांबायला हवं. दोन दिवसात कीर्तन थांबवण्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे म्हटल्याचे व्हिडिओत दिसतेय. मुलीच्या साखरपुड्यातील कपड्यावरून बातम्या केल्या, त्यावरून इंदुरीकर महाराज व्यथित झाल्याचे व्हिडिओत दिसतेय. त्यामुळे त्यांनी कीर्तन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसात याबाबत ते एक व्हिडिओ जारी करत माहिती देणार असल्याचे व्हिडिओतून समजतेय.

इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणाले ? Why Indurikar Maharaj decided to stop kirtan

पोरं लहान असताना ८-८ दिवस गाठभेट होत नव्हती. आता लोक इतकी खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगावर कपडे काय आहेत? यावर कमेंट्स करतात. यापेक्षा वाईट काय आहे. ४ दिवसांपासून मुलीच्या अंगावरील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या आहेत.

मला घोडे लावा हो.. माझा पिंड गेला आहे. पण माझ्या मुलीचा-मुलाचा काय दोष आहे. पण या कॅमेऱ्यावाऱ्याने आठ दिवसात जगणं मुश्कील केले. मुलगी तुम्हाला आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावर कुणी कमेंट केले तर तुम्हाला काय वाटेल. मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडील घेतात की मुलीकडील घेतात? कपडे त्यांनी आणले असतील की मी आणले असतील. पण ऐवढी क्लीप टाकणाऱ्यांना तरी लाज वाटली पाहिजे ना, असा संताप इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केला.

Indurikar Maharaj to Quit Kirtan
Gold Rate Today : सोन्याच्या भावात अचानक मोठी वाढ, प्रति तोळ्याला 'इतकी' किंमत; चांदी ३ दिवसात १५००० हजारांनी वाढली

माणूस नालायक असावा पण किती..त्यामुळे मी कंटाळलो आहे. दोन-तीन दिवसात मी थांबणार आहे. आता बास झाले. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं, आयुष्यात चांगलं करुन त्याचं फळ काय मिळाले...माझ्यापर्यंत ठीक होतं, पण घरापर्यंत जायला नको होतं. यांना उत्तरे द्यायला मी आजही समर्थ आहे. मला अजून दोन वर्षे आयुष्य आहे. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर मज्जा नाही. याची अक्कल इंदुरीकरांनाच आली पाहिजे, त्याने कीर्तने बंदच केली पाहिजेत. दोन-तीन दिवसांत मी निर्णय घेणार आहे. मज्जा नाही राहिली.

Indurikar Maharaj to Quit Kirtan
Train Accident : मुंबईहून घराकडे निघाले, कसारा घाटात मृत्यूने गाठले, रेल्वेतून पडून काँग्रेस नेत्याचं निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com