पंढरपूर: मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटीनिवडणूकीवरुन राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. अशातच कालपर्यंत भाजपच्या बाजूने री ओढणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeary) यांनी आज अचानक यु टर्न घेत अंधेरीची पोटनिवडणुक भाजपने लढवू नये, असं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उ़़डाली आहे. (Andheri East Assembly By-Election)
राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. यामध्ये भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी, आमचं ठरलय असं म्हणत अंधेरी पूर्वची पोट निवडणूक भाजप लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पाहा व्हिडीओे -
प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या हस्ते आज पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांनी लिहिल्या पत्रावर भाष्य केलं.
निवडणुका सहानभूतीवर लढवण्याचे दिवस संपले आहेत, आता विकासाच्या मुद्द्यावर लोक निवडून देतात. शिसेनेतून 50 आमदार बाहेर पडले तरी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सहानभूती मिळाली का? असा प्रश्न करत, उलट बाळासाहेबांच्या शिवसेना आमदारांचे राज्यात जंगी स्वागत होतय. लोक मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहेत असं म्हणत दरेकरांनी उध्दव ठाकरेंवर टिका केली.
राज ठाकरेंच्या पत्राबाबत विचारले असता, लोकशाहीत पत्र लिहिण्याचा, मत मांडण्याचा व व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आमचा उमेदवार निवडून आणणं हे आमचं ध्येय आहे. त्यासाठी आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे. तेथील जनता निवडून देईल असा आम्हाला विश्वास आहे.
शिवाय पक्ष म्हणून जो विचार करायचा असतो तो आमचं नेतृत्व ठरवतं आम्ही ठरवत नाही असे ही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज ठाकरेंच्या पत्रानंतर भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.