India's Flag: अभिमानास्पद! लाल किल्ल्यावर फडकतो नांदेडमध्ये तयार केलेला तिरंगा

Nanded News: अभिमानास्पद! लाल किल्ल्यावर फडकतो नांदेडमध्ये तयार केलेला तिरंगा
Red Fort
Red FortCanva
Published On

>> संजय सूर्यवंशी

Independence Day 2023 Special News:

राज्यासह देशभरात स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाने तब्बल एक कोटी तिरंगा झेंडे विक्रीसाठी तयार ठेवले आहेत.

येथे तयार केलेले झेंडे देशातील विविध भागांत विक्रीसाठी जात असतात. दिल्लीतील लाल किल्ल्यावरदेखील नांदेडमध्ये बनलेला तिरंगा डौलाने फडकतो.

Red Fort
Himachal Rains: हिमाचलमध्ये पावसाचा कहर; बस दरीत कोसळली, भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू...

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडचे मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळ हे राष्ट्रध्वज निर्मितीचे महाराष्ट्रातील एकमेव केंद्र आहे. या ठिकाणी 14 बाय 21 फुटांपर्यंत झेंड्यांची निर्मिती केली जाते. दरवर्षी एक कोटीपेक्षा जास्त राष्ट्रध्वज देशभर विक्री केले जातात. (Latest Marathi News)

भारतीय प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्ली येथील लाल किल्ल्यावर जो तिरंगा ध्वज फडकविला जातो, तो नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योगमध्ये तयार झालेला असतो. देशाच्या पंतप्रधान यांच्या हस्ते याच तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण होते. ही नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

Red Fort
Atal Pension Yojana: तुम्हालाही मिळू शकते दरमहा 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन, जाणून घ्या 'अटल पेन्शन योजने'चे फायदे

मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाने यावर्षी स्वातंत्र्यदिनासाठी 75 लाख रुपयांचे राष्ट्रध्वज विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजपर्यंत तब्बल 50 लाख रुपयांचे झेंडे विविध राज्यांमध्ये विक्री करण्यात आलेले आहेत, अशी माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाने दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com