Submarine Project : महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातला?; राजकारण पेटलं

Submarine Project : सिंधुदुर्गातील पाणीबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. राज्यातून परत एक प्रकल्प जाणार असल्यानं राज्यातील राजकारण तापलंय.अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय.
Submarine Project
Submarine Project
Published On

Danve And Awhad Slams State Government Over Submarine Project :

महाराष्ट्रातील अजून एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती समोर आलीय. सिंधुदुर्गातील पाणीबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. राज्यातून परत एक प्रकल्प जाणार असल्यानं राज्यातील राजकारण तापलंय. अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. सत्ताधारी पक्षाचे नेते यावर काय स्पष्टीकरण देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचं वृत्त समोर येताच विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केलीय. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या पर्यटनात भर घालणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा २०१८ मध्ये करण्यात आली होती. देशातील हा पहिला पाणबुडी प्रकल्प निवती रॉक्स जवळील समुद्रात येणार होता. पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पात योजना होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुजरात सरकार आणि माझगाव डॉकयार्ड द्वारकेच्या समुद्रात असाच पाणबुडी प्रकल्प राबवित आहे. जानेवारीत व्हायब्रेट गुजरात समिटमध्ये याची अधिकृत घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान सिंधुदुर्गात होणार असलेला पाणबुडी प्रकल्पात पर्यटकांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून पाहता येणार होती. या प्रकल्पामुळे स्थानिकांना सुद्धा रोजगार निर्मिती होणार होती.

इतकेच नाहीतर या प्रकल्पासाठी निधी देखील मंजूर झाला होता. निधी मिळाल्यानंतरही हा प्रकल्प गुजरातकडे कसा काय गेला, हे राजकीय नेत्यांना सांगावं लागेल. या प्रकल्पासाठी ५६ कोटी निधी मंजूर झाला होता. राज्यातील आणखीन एक उद्योग गुजरातला गेल्याने विरोधक सरकाराला धारेवर धरत आहेत. अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारावर टीकास्त्र सोडलंय.

जिल्ह्यात लघू, सूक्ष्म, मध्यम असे उद्योगमंत्री असताना सुद्धा त्याच्या नाकाखालून हे प्रकल्प गुजरातकडे गेला असं म्हणत दानवेंनी नारायण राणे यांच्यावर टीका केलीय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केलीय. तर संपूर्ण महाराष्ट्र गुजरात राज्यात न्या. बेरोजगारी वाढू द्या अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर हल्लाबोल केलाय. अख्या महाराष्ट्र गुजरात घेऊन जा बाबांनो , वाढू दे बेरोजगारी, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

Submarine Project
State Government Decision: अखेर योगा 'खेळाडूंना' न्याय मिळाला! तांबेंच्या मागणीला यश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com