Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी मणिपूरला जावं, खर्च मी करतो; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

INDIA Alliance Rally: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात INDIA आघाडीतील सहभागी पक्षांची आज रॅली होणार आहे. राज्यातून ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शरद पवार हे आदी नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Saam TV

Uddhav Thackeray Press Conference:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात INDIA आघाडीतील सहभागी पक्षांची आज रॅली होणार आहे. राज्यातून ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शरद पवार हे आदी नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तत्पुर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

देशात हुकुमशाही येऊ पाहत आहे. निवडणुकीच्या तोंडावर सोरेन, अरविंद केजरीवाल यांना अटक केली. हुकुमशाही आलेली आहे. या हुकुमशाहीचा सामना करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जात आहोत. माझे दौरे सुरू आहेत. सगळ्यांच्या मनात राग आहे, त्वेष आहे. जनता फक्त निवडणुकीची वाट पाहत आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर सिनेमा पाहावा, त्यांच्यासाठी मी संपूर्ण थिएटर बुक करतो, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर बोलताना "मी फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या जाण्या येण्याचा खर्च करतो. त्यांनी अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्ये जावं. कश्मिरी पंडित यांना भेटून याव.तसेच एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल चित्रपट काढावा," असा खोचक टोलाह उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
INDIA आघाडीच्या वतीने आज रामलीला मैदानावर 'सेव्ह डेमोक्रेसी रॅली'चं आयोजन, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह अनेक नेते राहणार उपस्थित

"निवडणूक रोख्यांमुळ अनेकांचं बिंग फुटलं आहे. त्यामुळे केजरीवाल यांना आत टाकले. भाजपने अनेकांवर आरोप केले आणि नंतर पक्षात घेतले आणि त्यांच्या केसेस बंद केल्या. राष्ट्रवादीचे सगळे ठग भाजपने घेतले आहेत. आम्ही ठग मुक्त झालो आहोत," असा टोलाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी लगावला.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis
Sambhajinagar Corporation : मनपाची १७६ कोटीची विक्रमी कर वसुली; छत्रपती संभाजीनगरात वसुली मोहीम, कर भरण्याची आज शेवटची संधी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com