Independence Day: 15 ऑगस्टला मांसाहारावर बंदी का? पालिकांचा मटणबंदीचा तुघलकी फतवा

Independence Day Meat Ban : 15 ऑगस्टला महापालिकांनी मांसाहार विक्रीवर बंदी घातलीय. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.राज्यात किती महापालिकांनी मांसाहार विक्री बंदी घातलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Independence Day Meat Ban
Chicken and Mutton Shops Close Independence Day saamtv
Published On
Summary
  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी काही महापालिकांनी मांस विक्रीवर बंदी लागू केली.

  • राष्ट्रीय सणांवर मांस विक्री बंद ठेवण्याचा नियम काही ठिकाणी आधीपासून आहे.

  • नागरिकांमध्ये या बंदीवरून मतभेद.

राष्ट्रीय सणांना ड्रायडे हे आपण मान्य करतो. पण आता थेट स्वातंत्र्यदिनी नागरिकांच्या खाण्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर बंदी घालणं कितपत योग्य ? कारण स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्टला काही महापालिकांनी मांसाहार विक्रीवर बंदी घातलीय.. मांसाहार विक्रीवर बंदी कुठल्या महापालिकांनी बंदी घातलीय पाहूया.

राष्ट्रीय सणांना ड्रायडे हे आपण मान्य करतो. पण आता थेट स्वातंत्र्यदिनी नागरिकांच्या खाण्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर बंदी घालणं कितपत योग्य ? कारण स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्टला काही महापालिकांनी मांसाहार विक्रीवर बंदी घातलीय.. मांसाहार विक्रीवर बंदी कुठल्या महापालिकांनी बंदी घातलीय पाहूया.

कल्याण- डोंबिवली महापालिका-

स्वातंत्र्यदिनी मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश

मालेगाव

स्वातंत्र्यदिनीच मांस विक्रीवर बंदी

छत्रपती संभाजीनगर

15 आणि 20 ऑगस्टला मटण विक्रीवर बंद

नागपूर महापालिका

स्वातंत्र्यदिनाचं कारण देत मांस विक्री बंद

अमरावती

15 ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी

जळगाव

स्वातंत्र्यदिनाला मांस विक्रीवर बंदी

इचलकरंजी

15 आणि 27 ऑगस्टला मटण-चिकन दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय

Independence Day Meat Ban
MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

दरम्यान महापालिकांच्या या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. आम्ही काय खावं हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल थेट नागरिकांकडून केला जातोय. भारतीय राज्यघटनेनं कलम 21 अंतर्गत खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार दिलाय. मात्र आता महापालिका धार्मिक आणि राष्ट्रीय सणांच्या आधारे मांसाहार विक्रीवर बंदी घालत असेल तर ती निश्चितच संविधानाची पायमल्ली आहे.

Independence Day Meat Ban
Independence Day 2025 : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राज्यातील 15 सरपंचांचा सन्मान होणार; कुणाला मिळाला मान?

एकीकडे रस्ता, पाणी, स्वच्छतेचे प्रश्न, वाहतूक कोंडी, बेकायदेशीर बांधकामं, अतिक्रमण असे अनेक प्रश्न महापालिकांसमोर असताना नको त्या विषयांसाठी महापालिका प्रशासन का आग्रही आहे? हा तुघलकी फतवा नेमका कशासाठी? आणि कुणाच्या सांगण्यावरून ? हा खरा सवाल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com