Congress : "आगामी काळात देशात 'काँग्रेस' अव्वल स्थानी"
गडचिरोली : गडचिरोली Gadchiroli येथे काँग्रेस मेळाव्यात (Congress meet) बऱ्याच काळानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole आणि बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) एकत्र एकाच मंचावरती दिसले. त्यांचे हे एकत्र दिसणे कार्यकर्त्यांना सुखावणारे ठरले आहे. तर याच मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आगामी काळात काँग्रेस देशात अव्वल स्थानी जाणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला आहे.
हे देखील पहा -
मेळाव्याला झालेली गर्दी या दोघांच्या एकत्रिकारणाचा परिपाक मानली जात आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने नाना पटोले यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड व्हावी, अशी भावना व्यक्त केली आणि याच मेळाव्यात या आशयाचा ठराव हात उंचावून मंजूरही करण्यात आला आहे. बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा राहुल यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याकडे कल असल्याचे मत पटोले यांनी यावेळी मांडले.
तसेच उत्साही काँग्रेस जनांमुळे येणाऱ्या काळात देशात काँग्रेसच अव्वल स्थानी जाणार असल्याचा दावा पटोले यांनी केला.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.