"ड्रग्ज प्रकरणामुळे; राज्यकर्ते काय लायकीचे आहेत ते कळाले"

राज्यात राजकिय नेत्यांचे टोळीयुद्ध सुरु झालं आहे. यातुन एकमेकांचे कपडे उतरविण्याचे काम सुरु आहे.
Raju Shetty
Raju ShettySaamTV
Published On

पुणे : ड्रग्ज Drugs प्रकरणावरुन आता नबाब मलिकांनी थेट भाजप नेत्यांनाच लक्ष केल्याने एकमेकांवर गंभीर आरोप सुरु झालेत. राज्यात राजकिय नेत्यांचे टोळीयुद्ध सुरु झालं आहे. यातुन एकमेकांचे कपडे उतरविण्याचे काम सुरु आहे. जनताही यांची मजा घेतेय. "चाललय ते चांगलं चाललय" असं म्हणत माजी खासदार राजु शेट्टींनी (Raju Shetty) भाजप आणि महाविकास आघाडीवर शेलक्या शब्दात टिका केली.

हे देखील पहा -

आम्ही मत देऊन ज्यांच्या ताब्यात राज्याचा कारभार दिलाय ते काय लायकीचे आहेत हेच या टोळीयुद्धातुन राज्यातील जनतेला कळायला लागलय. आज महाराष्ट्रातील शेतकरी, अतिवृष्टी, Heavy Rain आवकाळी पाऊसाने अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला मदतीची गरज आहे अशातच या कष्टक-याच्या पाठीमागे "ना विरोधीपक्ष ना सत्ताधारी उभे राहतात. दोघांनीही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडल आहे शेतक-यांचे मुलभुत प्रश्नाचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी एकमेकांवर आरोप करत राजकिय टोळीयुद्ध सुरु आहे असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजु शेट्टी यांनी केला आहे.

Raju Shetty
Mumbai : थेट दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली; एकाचा पाय फ्रॅक्चर, चौघे जखमी

जोपर्यत जनता खुळी आहे आणि जनतेला यांनी केलेल्या आरोपात रस आहे तोपर्यत हे ड्रग्ज प्रकरण सुरु राहणार असं म्हणत ड्रग्ज प्रकरणातील आरोपांवर राजु शेट्टींनी चिमटाही काढला. आज आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे बटाटा परिषदेच्या मेळाव्यात माजी खासदार राजु शेट्टी शेतक-यांना संबोधित करण्यासाठी आले होते यावेळी माध्यमांशी बोलताना ड्रग्ज प्रकरणावरुन भाजपासह BJP महाविकास आघाडीला (MVA Goverment) लक्ष केलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com