Sambhaji Nagar : औरंगाबाद शहराचे नाव कशाच्या आधारे बदलले? खासदार जलील यांचा थेट Google ला सवाल

Imtiaz Jaleel Tweet About Renaming Of Aurangabad : गुगल मॅपने नाव बदलल्याने आता याला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत विरोध केला आहे.
Aurangabad renamed 'Sambajinagar' on Google Maps
Aurangabad renamed 'Sambajinagar' on Google MapsSaam TV
Published On

मुंबई: औरंगाबादच्या नामांतरावर आधीच वाद सुरू असताना आता गुगल मॅपवर औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhaji Nagar) आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव उल्लेख केल्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने नामकरणाला मान्यता दिली नसली तरी गुगल मॅपने नाव बदलल्याने आता याला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी ट्विट करत विरोध केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत थेट गुगलला टॅग करत जाब विचारला आहे. (Imtiaz Jaleel Latest News)

हे देखील पाहा -

खासदार जलील यांनी ट्विट करत गुगलने कशाच्या आधारे शहराचे नाव बदलले असा सवाल उपस्थित केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी गुगलला टॅग करत म्हटले की, औरंगाबाद शहराचे नाव गुगलने कशाच्या आधारावर बदलले आहे हे तुम्ही स्पष्ट करू शकता का? तसेच ज्या कोट्यवधी नागरिकांसोबत हा खोडसाळपणा करण्यात आला आहे, त्याचं गुगलने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जलील यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मंत्रिमंडळानं आपल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेत औरंगाबाद शहराचे नामांतर करुन ते संभाजीनगर असे केले होते. त्याआधी ठाकरे सरकारनं आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. यानंतर राज्यातलं राजकारण तापलं होतं. एकीकडे शिवसेना या निर्णयाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं सरकार याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. नामांतराच्या या निर्णयाला एमआयएमचा तीव्र विरोध आहे.

याआधी ठाकरे सरकारकडून काही निर्णय अनधिकृतपणे घेण्यात आले होते. ते आता पुन्हा अधिकृत निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. यानुसार औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशीव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे “लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ” असे नामकरण करण्याचा निर्णय शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता.

Aurangabad renamed 'Sambajinagar' on Google Maps
'उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करायला तयार होते, पण...'; खासदार राहुल शेवाळे यांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत हा निर्णय जाहीर झाल्यानंतर जलील म्हणाले होते की, 'तुमची खुर्ची जाणार आहे, औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव आणला जात आहे. सत्ता जाऊ नये, खुर्ची जाऊ नये म्हणून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव पुढे आणून लोकांना भावनिक कसे करता येईल हा प्रयत्न आहे. नाव बदलल्यानंतर दुसऱ्यादिवशी औरंगाबादकरांना पाणी मिळणार का? ५० विमाने, १०० रेल्वे, पुण्याला घेऊन गेलेले विद्यापीठ पुन्हा मिळणार का? असा सवाल देखील खासदार जलील यांनी ठाकरे सरकारला केला होता. यानंतर जलील यांनी शिंदे सरकारच्याही निर्णयाला विरोध केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com