Rain Alert : महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम, विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Today Maharashtra Weather Rain Alert News : राज्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे विदर्भातील यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
Rain Alert : महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम,  विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Today Maharashtra Weather Rain Alert NewsSaam Tv
Published On
Summary
  • विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये वादळी पावसाचा इशारा

  • गारपीट व वाऱ्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

  • अनेक तालुक्यांमध्ये घरांची पडझड आणि शेतीचे मोठे नुकसान

  • शेतकऱ्यांकडून सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी

Today 25th February Maharashtra Weather Update News राज्यात थंडी हळूहळू ओसरून उकाडा वाढू लागला. मात्र काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसाने चांगलाच जोर धरला आहे. ठिकठिकाणी पडलेल्या या पावसाने नागरिकांना हैराण केलं आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर येथे वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हंगामी फळांनाआणि पिकांना पावसाने झोडपून काढल्याने बळीराजा चिंतेत असल्याचे पाहायला मिळतं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भात कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांवर गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. अशातच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपिटीने हजेरी लावली. आज विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर येथे वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलका पाऊस, उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Rain Alert : महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम,  विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Sambhajinagar News : ७ वर्षांच्या मुलीवर सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार, सख्ख्या आईनेच केली मदत; संभाजीनगरमध्ये खळबळ

उन्हाळा सुरु होण्यापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात १२ तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपले. ८,९६१ हेक्टरवरील गहू-हरभरा पिकाला फटका बसला आहे. घाटंजी, राळेगांव तालुक्यात २९ घरांची पडझड झाली असून एकट्या उमरखेड तालुक्यात ७, ४५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Rain Alert : महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम,  विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
Dog Abuse Case : विकृतीचा कळस! तरुणाचा कुत्रीवर बलात्कार, आरोपीच्या तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार घालून धिंड काढली

अवकाळी पाऊस,वादळी वारा आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आली आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com