IMA Sambhajinagar: IMA संभाजीनगर शाखेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, अध्यक्षपदी अनुपम टाकळकर

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजी नगर येथील IMA शाखेच्या कार्यकारिणीची निवडणूक निकाल जाहीर, डॉ. अनुपम टाकळकर अध्यक्ष, डॉ. विकास देशमुख नियोजित अध्यक्ष, डॉ. योगेश लक्कस सचिव, डॉ. शिवाजी पोळे कोषाध्यक्ष आणि इतर सदस्यांची निवड.
IMA छत्रपती संभाजीनगर
IMA छत्रपती संभाजीनगर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणाSaam Tv
Published On

साम टीव्ही, प्रतिनिधी, माधव सावरगावे

छत्रपती संभाजी नगर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) शाखेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील चौथ्या सर्वात मोठ्या IMA शाखेच्या या नव्या कार्यकारिणीची जबाबदारी पुढील सदस्यांवर असेल. अध्यक्ष - डॉ. अनुपम टाकळकर. नियोजित अध्यक्ष (२०२६-२७) - डॉ. विकास देशमुख. सचिव - डॉ. योगेश लक्कस. कोषाध्यक्ष - डॉ. शिवाजी पोळे. उपाध्यक्ष (महिला) - डॉ. अर्चना साने. उपाध्यक्ष (पुरुष) - डॉ. केदार साने. सहसचिव (प्रशासकीय) - डॉ. प्रशांत दरख. सहसचिव (क्लिनिकल) - डॉ. संभाजी चिंताले. सहसचिव (सांस्कृतिक) - डॉ. संजय पाटणे. सहसचिव (क्रीडा) - डॉ. गितेश दळवी. गतवर्षीच्या अध्यक्ष डॉ. उज्वला दहिफळे या कार्यकारिणीला मार्गदर्शन करतील.

या प्रसंगी निवडून आलेल्या सर्व पदाधिकारी व सभासदांचे निवडणूक अधिकारी व उपस्थितांनी अभिनंदन केले. तसेच, निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल निवडणूक आयुक्त डॉ. शेख मुर्तुझा, डॉ. जितेन कुलकर्णी, डॉ. संजीव इंदुरकर यांचे डॉक्टर यशवंत गाडे आणि सचिव डॉ. विकास देशमुख यांनी आभार मानले.

IMA छत्रपती संभाजीनगर
Sambhajiraje Chatrapti On Gautami Patil News | गौतमीच्या आडनावावरून संभाजी राजेंचं सुचक वक्तव्य

नवीन अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांनी आगामी काळात IMA सभासदांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काही गावे दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तिथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, आणि वैद्यकीय सेवा पोहोचवली जाणार आहे. गरजू नागरिकांना मोफत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल.

विविध जबाबदाऱ्या अधिकाधिक सभासदांना दिल्या जातील, जेणेकरून IMA च्या कार्यात जास्त सभासदांचा सक्रिय सहभाग असेल. समाजाच्या विविध स्तरांवर प्रभावी उपक्रम राबवण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरेल.

मानसिक आरोग्य महत्त्वाचे असल्यामुळे विशेष 'मेंटल हेल्थ कमिटी' गठीत केली जाणार आहे. डॉक्टर आणि नागरिकांसाठी मानसिक आरोग्य सल्ला, समुपदेशन, आणि जनजागृती मोहिमा राबवल्या जातील. मानसिक आरोग्याविषयी अधिक जागरूकता निर्माण केली जाईल.

IMA छत्रपती संभाजीनगर
Sambhajiraje Chatrapati : शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही; संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप

IMA प्रथमच एक विशेष Podcast सुरू करणार आहे. यात तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, आरोग्यविषयक महत्त्वाचे मुद्दे, आणि जनतेसाठी उपयुक्त माहिती दिली जाणार आहे. यामुळे नागरिकांना वैद्यकीय विषयांवरील विश्वासार्ह माहिती सहज उपलब्ध होईल.

IMA ही केवळ IMA हॉलपुरती मर्यादित न राहता, सर्वसामान्य नागरिकांसाठीही कार्य करेल. असे ठाम प्रतिपादन डॉ. अनुपम टाकळकर यांनी केले.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com