अवैध देशी दारुची वाहतूक करणाऱ्यांना वाहनांसह अटक; बाळापुर पोलिसांची कारवाई

अवैध देशी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आखाडा बाळापूर पोलिसांनी बोल्डा पाटीजवळ केली.
आखाडा बाळापूर पोलिसांची कारवाई
आखाडा बाळापूर पोलिसांची कारवाई
Published On: 

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : बाळापुर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बोल्डा फाटा रोडवर गुरुवारी (ता. एक) रात्रीच्या सुमारास दोन वाहनातून अवैध देशी दारुची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडून साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आखाडा बाळापूर पोलिसांनी बोल्डा पाटीजवळ केली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोल्डा रेल्वे स्टेशन भागांमध्ये वसमतकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्वतः च्या फायद्यासाठी अवैध देशी दारुची चोरटी वाहतूक करुन विक्री करण्याच्या उद्देशाने ( एमएच- ३८- व्ही- ४८६३) या वाहनामध्ये देशी दारुच्या ४८ बॉटलचा बॉक्स आणि कार (एमएच- १२- केएन- १०५१) यामध्ये एक देशी दारु चा बॉक्स विश्‍वनाथ रिठे राहणार पिंपळदरी ता. औंढा आणि शंकर अंबाटी राहणार सिंधी पेठ तेलंगाना हल्ली मुक्काम कुरुंदा ता. वसमत हे घेऊन जात होते.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पीडीत कुटुंबियांना सामाजिक न्यायाच्या योजना- डॉ. विपीन इटनकर

यावेळी आखाडा बाळापुरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी आपले सहकारी पोलिस हवालदार गंगाराम कराळे, शेख जावेद यांना सोबत घेऊन गुरुवारी रात्रीच्या सुमारास सापळा लावला. आणि या सापळ्यात दोन वाहने अलगद अडकले. त्यांची अधिकची चौकशी केली असता वाहनात अवैध देशी दारुचे बॉक्स सापडल्याने त्यांच्यावर गंगाराम कऱ्हाळे यांच्या फिर्यादीवरुन आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शेख जावेद करत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.