

Uddhav Thackeray vs Navneet Rana, Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार नवनीत राणा, रवी राणा यांच्यात पुन्हा 'सामना' रंगण्याची चिन्हे आहेत. यावेळी रवी राणा यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे ज्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार, तिथे नवनीत राणा त्यांच्याविरोधात लढतील, अशी घोषणाच राणा यांनी केली.
लोकसभा निवडणुका (Loksabha Elections 2024) जाहीर होण्याआधीच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर 'हनुमान चालिसा' म्हणण्यावरून नवनीत राणा आणि शिवसैनिकांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. उद्धव ठाकरेंवरही राणांनी टीकास्त्र सोडलं होतं. तर याच आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी राणांवर कारवाई करत त्यांना ताब्यातही घेतलं होतं.
आता पुन्हा राणा आणि ठाकरे आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. सर्व राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू असतानाच, राणांनी ठाकरेंना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या अमरावती मतदारसंघाबाबत मातोश्रीवर बैठक घेतली आहे. त्यावरून रवी राणांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे कोणत्या जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत, हे त्यांनी जाहीर करावं. ज्या मतदारसंघातून उद्धव ठाकरे निवडणूक लढणार, तिथे त्यांच्याविरोधात नवनीत राणा उभ्या राहतील, अशी घोषणाच रवी राणांनी केली.
अमरावती जिल्ह्याची चिंता उद्धव ठाकरेंनी करू नये. नवनीत राणा या पूर्णवेळ जनतेत असतात. अमरावतीची जनता नवनीत राणांसोबत आहे, असेही राणा म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.