hundred of congress karyakartas entered mim political party in nanded
hundred of congress karyakartas entered mim political party in nandedsaam tv

Congress पक्षातील शेकडाे कार्यकर्त्यांचा MIM पक्षात प्रवेश, अशाेक चव्हाणांवरही नाराजीचा सूर

MIM Political Party : मोहम्मद इलियास यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला यांच्या उपस्थितीत नुकताच एमआयएममध्ये प्रवेश केला.
Published on

- संजय सूर्यवंशी

Nanded :

नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातील काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. खासदार अशाेक चव्हाण (MP Ashok Chavan) यांनी भाजपची वाट धरल्याने कार्यकर्त्यांना निर्णय न पटल्याने शेकडाे कार्यकर्त्यांनी एमआयएमचा रस्ता धरल्याचे साम टीव्हीला सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खासदार अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला (nanded congress) राम राम ठाेकत भाजपमध्ये (bjp) प्रवेश केला. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली. त्यांच्या भाजप प्रवेशनानंतर नांदेड जिल्ह्यात काॅंग्रेस पक्षाला गळती सुरू झाली आहे.

hundred of congress karyakartas entered mim political party in nanded
Success Story : द्राक्षच्या पंढरीत तैवान पेरुची लागवड, अल्पावधीत शेतक-याने कमावले 8 लाख

खासदरा चव्हाण यांचा भोकर मतदारसंघ हा बालेकिल्ला मानला जाताे. चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर भोकर मधील बहुतांश कार्यकर्ते नाराज झाले. मोहम्मद इलियास यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला यांच्या उपस्थितीत नुकताच एमआयएममध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

hundred of congress karyakartas entered mim political party in nanded
Nanded Sunegoan Talav : लाेहा शहरावर भीषण पाणी टंचाईचे सावट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com