HSC Exam: All the Best! आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात

यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
HSC Exam
HSC ExamSaam Tv

HSC Exam : राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून बोर्ड सह इतर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. 21 मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू असणार आहे. यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या असल्याचे बोलले जात आहे. 3 हजार 195 मुख्य केंद्रावर बारावीची परीक्षा पार पडेल. (Latest HSC Exam 2023)

HSC Exam
Shivsena Bhavan News : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा (HSC Exam) दरम्यान काम करतील. पहिल्या सत्रातील परीक्षा ही सकाळी अकरा वाजता सुरू होणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यासाठी साडेदहा वाजताच परीक्षा केंद्रावर हजर व्हायचे आहे. तर दुसऱ्या सत्रात होणारी परीक्षा ही तीन वाजता असणार आहे. त्यासाठी अर्धा तास अगोदर म्हणजेच अडीच वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहायचे आहे.

कॉपी मुक्त अभियान

गेली दोन वर्ष विद्यार्थ्यांनी घरुनचं परीक्षा दिली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी कॅमेरे सुरू असतानाही कॉपी करत परीक्षा दिली आहे. त्यामुळे यंदा कॉपी मुक्त अभियान सतर्कतेने राबवण्यात येणार आहे. भरारी पथक आणि बैठी पथक केंद्रांवर असणार आहेत. विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटीची १० मिनिटं वाढवून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याची पूर्ण तयारी झाली आहे.

HSC Exam
Bhaskar Jadhav : मतं मागायची असतील तर मोदींच्या फोटोवर मागा, बाळासाहेबांच्या नाही; भास्कर जाधव संतापले!

'या' नियमांचे पालन करावे लागणार

  • प्रत्येक केंद्रावर ५० मीटर अंतरावर कुठल्याही व्यक्तीला विद्यार्थी व्यतिरिक्त कोणाला ही फिरायला परवानगी नाही.

  • प्रत्येक परीक्षा केंद्रापासून ५० मीटर अंतरावर झेरॉक्सचे दुकान बंद.

  • सुरक्षेच्या कारणास्तव पेपर कस्टडीमध्ये नेताना जी पी एस लावण्यात येणार.

  • उच्च शिक्षण विभाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप असला तरी सुद्धा बारावीचं प्रॅक्टिकल पार पडणार.

  • कुठलेही कॉलेज राहिले असतील तर थेरीनंतर प्रॅक्टिकल देता येणार.

  • परीक्षा केंद्रावर कलम १४४ अंतर्गत आदेश लागू.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com