Tanisha Bormanikar: बारावीला १०० टक्के मिळवणारी तनिषा बोरमणीकर कोण आहे? याआधीही जगाच्या नकाशावर गाजवलंय छत्रपती संभाजीनगरचं नाव

Who Is Tanisha Bormanikar: राज्यात आज बारावीचा निकाल जाहीर झाला. यात अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. बारावीच्या परिक्षेत छत्रपती संभाजी नगरच्या तनिषा तनिषा बोरमणीकरने १०० टक्के मिळवले आहे.
Tanisha Bormanikar
Tanisha BormanikarSaam Tv

राज्यात आज बारावीचा निकाल जाहीर झाला. यात अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. बारावीच्या परिक्षेत छत्रपती संभाजी नगरच्या तनिषा बोरमणीकरने १०० टक्के मिळवले आहे. तनिषा बोरमणीकरने संपूर्ण देशात संभाजीनगरचे नाव मोठे केले आहे. तनिषा ही अभ्यासासोबतच खेळातदेखील हुशार आहे. तनिषा ही आंतरराष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ खेळते.

तनिषाने मालदीव येथे झालेल्या उकुलहास येथील पश्चिम आशिया युवा चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवले आहे. या स्पर्धेत तनिषा दुसरी आली होती. १६ वर्षांखालील वयोगटात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. यात २५० खेळांडूमध्ये तिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. स्पर्धेत तनिषाने फक्त अर्ध्या गुणाने सुवर्ण पदक गमावले होते. तिला या कामगिरीसाठी FIDE कडून वुमन कॅन्डीडेट मास्टर या पदवीने सन्मानित केले आहे.

तनिषा ही अभ्यासात खूप हुशार आहे. बारावीत तिने १०० टक्के मिळवले आहे. तिने दहावीच्या परीक्षेत ९८.२ टक्के गुण प्राप्त केले होते. तनिषाला मोठे होऊन सीए बनायचे आहे. ती सध्या सीए फाउंडेशनच्या परीक्षेची तयारी करत आहे.

Tanisha Bormanikar
Saam Exclusive : बारावीला १०० टक्के मिळवणाऱ्या तनिषा बोरमणीकरनं कशी केली होती परीक्षेची तयारी? बघा VIDEO फक्त 'साम टीव्ही'वर

तनिषा ही खूप हुशार विद्यार्थिनी आणि अष्टपैलू खेळाडू आहे. तिला बारावीत घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना आणि शिक्षकांना खूप आनंद झाला आहे. तनिषा संभाजीनगरची आहे. ती संभाजी नगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये शिकत होती. बारावीच्या परीक्षेत १०० टक्के मिळवणारी तनिषा ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे.

Tanisha Bormanikar
Maharashtra HSC result 2024 : राज्यातील बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी; ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com