Team India News: T-20 WC मध्ये हे ३ खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतात ब्रम्हास्त्र

Team India, T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकप सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत ३ खेळाडू आहेत जे भारतीय संघासाठी शानदार कामगिरी करु शकतात.
Team India News: T-20 WC मध्ये हे ३ खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतात ब्रम्हास्त्र
These 3 indian players will play crucial role for team india in icc t20 world cup 2024 amd2000saam tv news

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून होणार आहे. अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये होणारी ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघ पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ९ जून रोजी भारतीय संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत ३ असे खेळाडू आहेत जे भारतीय संघाला दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावू शकतात.

१) विराट कोहली -

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत विराट कोहली हा भारतीय संघासाठी प्रमुख खेळाडू ठरू शकतो. यापूर्वीही अनेकदा त्याने संघाला पराभवातून बाहेर काढून विजय मिळवून दिला आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत तो तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑरेंज कॅपचा मानकरी असलेल्या विराटने आतापर्यंत १३ सामन्यांमध्ये ६६१ धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा साखळी फेरीतील १ सामना शिल्लक आहे. जर या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला तर आणखी काही सामने खेळण्याची संधी मिळेल. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतक झळकावले आहेत. आगामी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

Team India News: T-20 WC मध्ये हे ३ खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतात ब्रम्हास्त्र
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

२) सूर्यकुमार यादव -

सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा टी -२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. टी -२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असलेला सूर्यकुमार यादव गोलंदाजांची चांगलीच धुलाई करू शकतो. रोहित, यशस्वी आणि विराटनंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला येऊ शकतो. आयपीएल २०२४ स्पर्धेतील काही सामन्यांमध्ये देखील त्याने सुंदर खेळी केली आहे. या स्पर्धेत त्याच्याकडून ३६० डिग्री फलंदाजीची अपेक्षा असणार आहे.

Team India News: T-20 WC मध्ये हे ३ खेळाडू टीम इंडियासाठी ठरु शकतात ब्रम्हास्त्र
IPL 2024 Playoffs Prediction: लिहून घ्या! हेच ४ संघ करणार IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये प्रवेश

३) शिवम दुबे -

शिवम दुबे हा भारतीय संघासाठी मॅच विनर ठरू शकतो. त्याच्या फलंदाजीत युवराज सिंगची झलक पाहायला मिळते. त्याच्याकडे फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठ मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. वेस्टइंडीजची खेळपट्टी स्लो असणार आहे. त्यामुळे बहुतांश संघ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरतील. अशावेळी शिवम दुबेसारखा फलंदाज संघात असणं फायदेशीर ठरू शकतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com