
महाराष्ट्र राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच लाडकी बहीण योजना लागू केली होती. ही योजना राज्यात सुपरहीट ठरली. या योजनेनुसार, राज्यातील गरजू महिलांना दरमहा २१०० रुपये मिळणार आहेत.
ही योजना विशेषत: घटस्फोटीत, विधवा, परित्यत्का, विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी तयार करण्यात आली आहे.
ही योजना ज्यावेळी सुरु झाली, त्यावेळी महिलांना १५०० रुपये दिले जात होते. मात्र आता महायुतीचं सरकार आल्यानंतर, हे पैसे २१०० रुपये करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. या पैशांचा वापर करुन महिला आपल्या गरजा पूर्ण करु शकतील.
ही योजना महाराष्ट्रात राहणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू करण्यात आली आहे. अविवाहीत आणि गरीब महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी सरकारकडून ही योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील लाखो बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला. मात्र काहींना पैसे आले, तर काहींना पैसे आलेच नाहीत. तुमचं नाव या योजनेच्या यादीत आहे की, नाही? हे कसं ओळखाल? जाणून घ्या.
तुमचं नाव या यादीत आहे की नाही, हे चेक करण्यासाठी तुम्हाला testmmmlby.mahaitgov.in या सांकेतिक स्थळावर भेट द्यावी लागेल. या सांकेतिक स्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला beneficiary status चा पर्याय दिसेल.
यावर क्लिक केल्यानंतर, एक पेज ओपन होईल जिथे तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कॅप्चा फिल करा, तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी टाका आणि तुमचं नाव चेक करा.
योजनांची यादी पाहायची असल्यास तुम्हाला, महानगर पालिकेच्या सांकेतिक स्थळावर जावं लागेल. तिथे जाऊन माझी लाडकी बहीण योजना यादीवर क्लिक करा. तुमचा प्रभाग निवडून मग यादी डाऊनलोड करुन तुम्ही माहिती मिळवू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.