HMPV Virus: 'एचएमपीव्ही'मुळे आरोग्य विभाग सतर्क, राज्यात एकही रुग्ण नसल्याचा दावा; तरीही अशी घ्या काळजी

Health Department On HMPV: चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्ही व्हायरसमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात एकही रुग्ण नसल्याचा दावा आरोग्य विभागाद्वारे करण्यात आला आहे. तरी देखील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
HMPV Virus: 'एचएमपीव्ही'मुळे आरोग्य विभाग सतर्क, राज्यात एकही रुग्ण नसल्याचा दावा
HMPV Virus Saam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

चीनमध्ये कोरोनानंतर आता नव्या व्हायरसने थैमान घातलं आहे. या व्हायरसने सर्वांची चिंता वाढवली आहे. ह्युमन मेटाप्युमो व्हायरस (HMPV) या व्हायरसचे चीनमध्ये मोठ्याप्रमाणात रुग्ण वाढत आहे. या व्हायरसमुळे आता इतर देश देखील अलर्ट मोडवर आले आहेत. भारतामध्ये खबरदारी घेण्यास सुरूवात झाली आहे. एचएमपीव्ही व्हायरसमुळे राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात एकही रुग्ण नसल्याचा दावा आरोग्य विभागाद्वारे करण्यात आला आहे.

एचएमपीव्ही व्हायरसमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून सर्दी, खोकला आणि 'सारी'च्या रुग्णांचे सर्वेक्षण अधिक गतिमान करून अहवाल सादर करण्याच्या सूचना सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आल्या आहेत. चीनमध्ये 'ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस'चे (एचएमपीव्ही) रुग्ण आढळून येत असल्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. आरोग्य विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

HMPV Virus: 'एचएमपीव्ही'मुळे आरोग्य विभाग सतर्क, राज्यात एकही रुग्ण नसल्याचा दावा
HMPV Virus : चीनमध्ये थैमान, भारतात सावधगिरी; सरकारने नागरिकांना काय सूचना केल्या आहेत? वाचा

राज्यात आतापर्यंत 'एचएमपीव्ही' व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले नाही. तसेच श्वसनविकाराच्या आजारांमध्ये वाढ झाली नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी चिंता करण्याचे काहीच कारण नाही. महत्वाचे म्हणजे खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने नागरिकांना काही सूचना केल्या आहेत त्याचे सर्वांनी पालन करावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

HMPV Virus: 'एचएमपीव्ही'मुळे आरोग्य विभाग सतर्क, राज्यात एकही रुग्ण नसल्याचा दावा
HMPV Virus Outbreak : HMPV व्हायरस जीवघेणा आहे का? भारताला याचा किती धोका? IMA च्या तज्ज्ञांनी दिली संपूर्ण माहिती

काय करावे? -

- शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करावा.

- हात वारंवार धुवावे.

- पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.

- ताप, खोकला असताना सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे.

- संसर्ग कमी करण्यासाठी हवा खेळती ठेवावी.

HMPV Virus: 'एचएमपीव्ही'मुळे आरोग्य विभाग सतर्क, राज्यात एकही रुग्ण नसल्याचा दावा
HMPV Virus: चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान; HMPV व्हायरसचा चिमुकल्यांना धोका

काय करू नये?

- स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नये.

- आजारी लोकांशी संपर्क टाळावा.

- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे.

- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.

HMPV Virus: 'एचएमपीव्ही'मुळे आरोग्य विभाग सतर्क, राज्यात एकही रुग्ण नसल्याचा दावा
HMPV Virus: कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एक व्हायरस, भारताला धोका किती? आरोग्य मंत्रालयाकडून मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com