भिंगारमध्ये मृत्यू, खुल्ताबादला कबर का? औरंगजेबाच्या कबरीचा इतिहास काय? मातीची कबर कुणी संगमरवरी केली?

History of Aurangzeb : राज्यात पुन्हा औरंगजेबाच्या कबरीचा वाद उफाळून आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या खुल्ताबादमध्ये असलेली औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
History of Aurangzeb
History of AurangzebSaam Tv News
Published On

भरत मोहोळकर

छत्रपती संभाजीनगर : स्वराज्याचा शत्रू क्रुरकर्मा औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी हिंदूत्ववादी संघटनांनी केलीय. त्यामुळे कबरीचा वाद पेटलाय. मात्र भिंगारमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला असताना ही कबर खुल्ताबादला का? मातीचं थडगं संगमरवरी कुणी केलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

राज्यात पुन्हा औरंगजेबाच्या कबरीचा वाद उफाळून आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या खुल्ताबादमध्ये असलेली औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यापार्श्वभुमीवर आम्ही थेट खुलताबाद गाठलं आणि औरंगजेबाच्या कबरीचा इतिहास जाणून घेतला.

History of Aurangzeb
Beed Accident : चहा पिऊन परतताना काळाची झडप, भरधाव वाहनाची स्कूटीला धडक; नामांकित डॉक्टरसह एकाचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य जिंकण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला आधी छत्रपती संभाजी महाराजांनी आणि त्यांच्यानंतर महाराणी ताराराणींनी तब्बल 27 वर्षे झुंजवत ठेवलं, आणि अखेर स्वराज्य न जिंकताच औरंगजेब १७०७ मध्ये महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला. औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगरमध्ये झाला असताना त्याची कबर खुल्ताबादला कशी? हे जाणून घेण्यासाठी आम्ही इतिहास अभ्यासकांना भेटलो. यावेळी त्यांनी काय सांगितलंय? पाहूयात.

औरंगजेबाच्या कबरीचा इतिहास

1707 औरंगजेबाचा अहमदनगरमध्ये मृत्यू

औरंगजेबाच्या इच्छेनुसार दफनविधी खुल्ताबादला

14 रुपये 12 आणे खर्चून मुलगा आझमशाहने मातीची कबर बांधली

1904 ब्रिटीश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनकडून कबरीला संगमरवरी सजावट

1951 औरंगजेबाच्या कबरीचा वारसा स्थळात समावेश

2023 सरकारने 170 स्मारकं वारसा स्थळ यादीतून वगळली मात्र कबरीला अभय

History of Aurangzeb
Nagpur Clash : नागपुरात मोठा राडा; २ गटातील वादानंतर दगडफेक अन् जाळपोळ; घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविरोधात औरंगजेबाने आयुष्यभर संघर्ष केला.तरीही त्याला शेवटपर्यंत मराठ्यांवर विजय मिळवता आला नाही. महाराष्ट्रावर राज्य करण्याचं त्यांच स्वप्न याच मातीत औरंगजेबाची कबर खोदून मराठ्यांनीच धुळीस मिळवलं. अशा औरंगजेबाची कबरच खणून टाकली तर पुढच्या पिढ्यांना नेमका काय इतिहास सांगितला जाणार?

History of Aurangzeb
Pune Accident : यात्रेच्या डेकोरेशनला जाताना भीषण अपघात, भरधाव कारची पिकअपला धडक; रस्त्यावर काचेचा थर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com