छत्रपती संभाजीनगरमध्ये इतिहास घडला! भाजपची एकहाती सत्ता; MIM ला अनपेक्षित यश, शिंदेंना मोठा धक्का

Sambhaji Nagar Municipal Election Result : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. तर शिंदे सेनेला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमला अनपेक्षित यश मिळालं आहे.
Sambhaji Nagar Municipal Election Result
Sambhaji Nagar Municipal Election Resultsaam tv
Published On

डॉ. माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि एमआयएमने जबरदस्त मुसंडी मारली आहे. भाजपने ५८ जागा जिंकत एकहाती सत्ता आणली. तर अपेक्षित नसतानाही एमआयएमने तब्बल 33 जागा जिंकल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळू शकली नाही. उलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. आता महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक पक्ष तोही भाजप सत्ता स्थापन करेल. तर एमआयएम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असेल.

  • एकूण जागा 115 :

  • भाजप : 58

  • शिवसेना : 12

  • शिवसेना UBT : 6

  • एमआयएम : 33

  • काँग्रेस : 1

  • राष्ट्रवादी : 0

  • राष्ट्रवादी SP : 1

  • वंचित बहुजन आघाडी 4

कोण काय म्हणालं?

सत्ता आणि संपत्ती याचा वापर महापालिकेत झाला. ५ हजार ते १२ हजार रुपये प्रत्येक मताला वाटले. निवडणूक विभाग त्यांच्याकडे आहे. ते काही करणार नाहीत. माझ्याकडे अशी तक्रार आली आहे की अगोदरच मतदान झाले, असे गंभीर आरोप ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला.

भाजपने या शहराला पाणी दिले नाही. या शहराला कर्जाच्या दरीत ढकलले. तरीही भाजपला यश मिळाले. आम्हाला पराभव मान्य आहे, अशा शब्दांत दानवेंनी पराभव स्वीकारला.

महापालिका निवडणुकीबाबत शिंदेसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली. आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. आम्हाला जनतेचा निर्णय मान्य आहे. उमेदवार द्यायला आमची चूक झाली असेल. अंतर्गत राजकारणाचा आणि बदलीचा फटका आम्हाला बसला आहे. लक्ष केंद्रीत करायला हवं होतं. ते झालं नाही, असे शिरसाट म्हणाले.

भाजपबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणाले त्याला आम्ही महत्व देत नाही. युती झाली असती तर काय झालं असतं, याला काही अर्थ नाही. भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल यात वाईट काय आहे. इथे नाही तर अनेक ठिकाणी तेच झाले. सत्ता येईलच असे नाही. जनतेचा निर्णय मान्य करावा लागतो, असे शिरसाट म्हणाले.

Sambhaji Nagar Municipal Election Result
Municipal Election Result: कुंभमेळानगरी नाशिकमध्ये काय सांगता सुरुवातीचे आकडे? मनसेच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार की धनुष्यबाण चालणार? VIDEO

एमआयएमला मिळालेल्या यशानंतर इम्तियाज जलील यांनीही प्रतिक्रिया दिली. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ओवैसी यांनाही विश्वास नव्हता की इतक्या जागा मिळतील. पण ३५ जागांवर विजय मिळेल, असा मला विश्वास होता. हैदराबादनंतर छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे. लोक म्हणत होते की आता एमआयएम संपत चालला आहे. पण ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचे मी आभार मानतो, असे जलील म्हणाले.

Sambhaji Nagar Municipal Election Result
Akola Election Winning Candidate List: काँग्रेस की भाजप; अकोल्यात कोण जिंकलं? वाचा उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com