Hingoli
Hingoli NewsSaam TV

Hingoli News : जिल्हा परिषदेच्या शाळेची पावसाळ्यात दुर्दशा; विद्यार्थ्यांचे हाल, ओल्या भिंती आणि जमिनीवर बसून घ्यावं लागतंय शिक्षण

Hingoli Zilla Parishad School : शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांवर पावसाने गळती लागलेल्या इमारतीमध्ये बसून धडे गिरवण्याची वेळ आली आहे.
Published on

संदिप नागरे, हिंगोली

राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळेतील दर्जा सुधारावा यासाठी राज्यसरकार वेगवेगळी पाऊले उचलत आहे. ग्रामीण भागातील नागरिक देखील स्वतःच्या खिशातील रक्कम खर्च करत आहेत. लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र हिंगोलीमध्ये जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांवर पावसाने गळती लागलेल्या इमारतीमध्ये बसून धडे गिरवण्याची वेळ आली आहे.

Hingoli
VBA Opposes Manusmriti In School Syllabus: मनुस्मृतीचे समर्थन करणारा शैक्षणिक आराखडा रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू : वंचितचा इशारा

वर्गात बसलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पावसाने गळती सुरू असलेल्या छताचे पाणी पडत आहे. हा प्रकार हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ब्रह्मपुरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून समोर आला आहे. ब्रह्मपुरी गावामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत एकूण 70 विद्यार्थी शिक्षण घेतात.

गावात शिक्षणाचा दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने गावातील पालक आपल्या चिमुकल्यांचा जीव धोक्यात घालून या शाळेत पाठवतात. धक्कादायकबाब म्हणजे मागील वर्षभरापासून या गावातील जिल्हा परिषद शाळेची ही अवस्था असून याकडे लोकप्रतिनिधीसह हिंगोलीच्या शिक्षण विभागाने देखील दुर्लक्ष केल आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे हिंगोलीच्या जिल्हा नियोजन मंडळामधून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला. असे असूनही ब्रह्मपुरी गावात मात्र विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी वर्गखोल्या देखील उपलब्ध नाहीयेत. या सगळ्या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना आम्ही का पाठवावं? असा सवाल संतप्त पालक विचारात आहेत.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वेगळी सुविधा देखील नाहीये. विद्यार्थ्यांना बँच किंवा खुर्चांची सोय केलेली नाही. येथील सर्व विद्यार्थी खाली जमिनीवरच मांडी घालून बसत आहेत. पावसामुळे जमिनीवर सुद्धा पाणी साचलेलं दिसतंय. त्याच पाण्यात विद्यार्थी बसले असून शिक्षण घेत आहेत.

Hingoli
Sangli kannada School VIDEO: कन्नड शाळेत, मराठी शिक्षक नियुक्ती प्रकरणी वाद, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com