Hingoli Crime : काय सांगता? चोरी करून चोरटे थेट विमानाने गुवाहाटीला पळाले; कुठे घडला हा प्रकार?

येथील एका मंदिरात चोरट्यांनी चोरी करून थेट गुवाहाटीला पळ काढला होता
Hingoli Crime News
Hingoli Crime NewsSaam TV

Hingoli Crime News : राज्यात चोरी, मारामारी, दरोडे, अशा गंभीर गुन्ह्यांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, अशात हिंगोलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका मंदिरात चोरट्यांनी चोरी करून थेट गुवाहाटीला पळ काढला होता. (Latest Marathi News)

Hingoli Crime News
Satara Crime : पोलिस पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी; अमित भोसले हत्याकांडाचा १० दिवसानंतर छडा

याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चोरट्यांना थेट गुवाहाटी येथे जाऊन अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा आसामधील गुवाहाटीची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात गुवाहाटीची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, आता यावेळी वेगळ्याच कारणाने गुवाहाटी शहराची चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, २५ जानेवारीला हिंगोली (Hingoli) येथील खडेश्वर महादेव मंदिरात काही चोरटे शिरले. यावेळी त्यांनी मंदिरातील पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील तसेच मंदिरातील दानपेटीतील पैसे घेऊन पळ काढला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

Hingoli Crime News
Viral Video : तुफान राडा! नाशकात तरुणींमध्ये जोरदार हाणामारी; एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police) तपासाची चक्रे फिरवली. मंदिरात चोरी करणारे चोरटे हे थेट विमानाने आसाममधील गुवाहाटीला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीनंतर पोलिसांच्या एका पथकाने थेट गुवाहाटी गाठली आणि या चोरट्यांना अटक करून त्यांची रवानगी थेट तुरूंगात करण्यात आली.

पोलिसांनी या चोरट्यांकडून गुन्ह्यात (Crime News) वापरलेला गावठी कट्टा, जिवंत काडतुस आणि सोन्या-चांदीच्या रोख रक्कमेसह ३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी थेट चोरट्यांना गुवाहाटीवरून परत आणल्याने त्यांचं कौतुक केलं जात आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com