हिंगोली जिल्ह्यातील डिग्रसवाणी गावच्या फॉरेन रीटर्न महिला सरपंच चित्रा अनिल कुरे यांना आपलं सरपंचपद गमवावं लागलं आहे. निवडणूक विभागाच्या नियमांचे पालन न केल्याने कुरे यांना सरपंचपदावरून हटवण्यात आलं आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाने ही कारवाई केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
चित्रा कुरे २०२२ मध्ये डिग्रसवाणी गावातील (Hingoli News) ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्या होत्या. सरपंचपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गावचं रुपडं बदलण्याचा निर्णय घेतला. सुरुवात त्यांनी आपल्या कार्यालयापासून सुरू केली आहे. गावामध्ये सुसज्ज आणि प्रशस्त अशा इमारतीची उभारणी केली.
यामध्ये महिलांना स्वच्छतागृहाची सुविधा, बैठक व्यवस्था, ईतरही भौतिक सुविधा केल्या. याशिवाय गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती, तसेच १०० टक्के हागणदारी मुक्त गाव, विविध कामांचे प्लॅनिंग त्यांनी सुरू केले. याशिवाय चित्रा यांनी वर्षभरातच गावात विविध उपाययोजन राबविल्या.
सरपंच पदावर काम करीत असताना एक हुशार आणि विश्वासू महिला सरपंच म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. चित्रा यांनी राज्यशास्त्र या विषयांमध्ये स्पेनमध्ये २०११- ते १६ मध्ये पी.एच.डी. पूर्ण केली. आपल्या हुशारीच्या जोरावर त्यांनी आतापर्यंत ८ देशांचे दौरे केले आहेत.
यामधे स्वीडन, जर्मनी, नेदरलँड, पोर्तुगाल, पॅरिस यासारख्या देशांत त्या जावून आल्या आहेत. त्यांचं स्पॅनिश, इंग्लिश अशा विविध भाषांवरही त्यांचे प्रभुत्व आहे. केवळ निवडणूक विभागात निवडणुकीचा खर्च दाखल न केल्याने अशा हुशार आणि विश्वासू महिला सरपंचाला आपलं सरपंचपद गमावावं लागल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.