Beed News : देशात आणि राज्यात एकीकडे स्वार्थ साधण्यासाठी जाती धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी समाज विघातक घटक सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे आजही समाजातील बहुतांश लोक जाती धर्मापलीकडे माणुसकी हाच धर्म सर्वात मोठा आहे असं त्यांच्या कृतीतून दाखवून देतात. बीडच्या (beed) ममदापुर पाटोदा येथील ग्रामस्थांनी सामाजिक ऐक्य कायम राहणार असे त्यांच्या कृतीमधून दाखवून दिले आहे. यामळे सामाजिक एकाेप्याचा संदेश समाज माध्यमातून देखील व्हायरल हाेत आहे. (Maharashtra News)
अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर पाटोदा गावात, दरवर्षी प्रमाणे यंदाही अखंड हरीनाम सप्ताहचे आयोजन सर्व गावाकऱ्याच्या वतीने करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादसाठी सर्व गावकरी सहभागी असतात.
यादरम्यान गावातील मुस्लिम बांधवाना रमजानचे रोजे सुरु असल्याने, सप्ताहात त्यांच्या रोजा इफ्तारची पंगतिचे आयोजन करण्यात आले. गावचे सरपंच अविनाश उगले यांच्या संकल्पनेतून हा अनोखा एक प्रकारचा सोहळा पार पडलाय.
दरम्यान या गावची सामाजिक ऐक्याची परंपरा आहे. सर्व सण उत्सव, सामाजिक धार्मिक उत्सव एकमेकांना सहभागी करून घेऊन साजरे करण्यात येतात. राजकीय दृष्ट्या सुद्धा निवडणूक संपली कि दुसऱ्या दिवशी पासून सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्रित काम करतात हे विशेष आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.