Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Hindi Language: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अखेर पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी विषय हद्दपार झाला आहे. सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वाचा सविस्तर....
Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर
Maharashtra SchoolSaam Tv
Published On

शालेय शिक्षण मंत्र्यांनी हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. पण हिंदी भाषा सक्तीला राज्याभरातील अनेक राजकीय पक्ष, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांसह नागरिकांनी विरोध केला. हा विरोध लक्षात घेता सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतला. या निर्णयानंतर आता पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी भाषा हद्दपार झाली आहे. नव्या वेळापत्रकानुसार कला, क्रीडा, कार्यानुभवाच्या कालावधीत वाढ करण्यात आला आहे.

पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर 'एससीईआरटी'ने अखेर सुधारित वेळापत्रक जाहीर केले. या सुधारित वेळापत्रकामध्ये हिंदी हा विषय हटविण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये केवळ या दोनच भाषा शिकवल्या जाणार आहेत. तर, कला, क्रीडा आणि कार्यानुभवाच्या तासिकांचा कालावधी पूर्ववत करण्यात आला आहे.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर
Hindi Language Controversy : हिंदी सक्ती विरोधात ठाकरेंची शिवसेना-मनसेचं एकत्र आंदोलन, शासनाच्या परिपत्रकाची होळी

शाळांनी लवकरात लवकर विषयनिहाय तासिका विभागणीच्या आधारे वेळापत्रक तयार करावे, अशी सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) केली. सुधारित वेळापत्रकात कला, क्रीडा, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयांच्या तासिकांचा कालावधी कायम ठेवण्यात आला असून साप्ताहिक तासिकांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर
Hindi Language: मराठी अस्मितेचा जयघोष! हिंदी सक्तीचे आदेश रद्द,मनसेकडून शिवतीर्थावर जल्लोष पाहा VIDEO

शारीरिक शिक्षण व कार्यानुभावा या दोन्ही विषयांसाठी एक अतिरिक्त तासिका देण्यात आली आहे. कलाशिक्षणाच्या दोन तासिका वाढविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार निश्चित केलेल्या घड्याळी तासांच्या तुलनेत एसईआरटीने शारीरिक शिक्षण कार्यानुभावासाठी १५ मिनिटे अधिक कालावधी दिला आहे. कलाशिक्षणाचा कालावधी अर्धा तास कमी करण्यात आला आहे.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर
Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com