High Court News : 'मूल जन्माला येणारच आहे तर...', अल्पवयीन पीडितेला 28 आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाचा नकार

Chhatrapati Sambhjinagar News : पीडितेच्या आईने दाखल केलेल्या याचिकेत तिने आपल्या मुलीच्या 28 आठवड्यांच्या गरोदरपणाचा गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती.
High Court News
High Court News Saam TV
Published On

Mumbai News : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यास परवानगी नाकारली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला असून ती 28 आठवड्यांची गर्भवती आहे. यावेळी, गर्भपातासाठी मुलीची बळजबरीने प्रसूती करावी लागेल, असे वैद्यकीय मंडळाच्या हवाल्याने उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पीडितेच्या आईने दाखल केलेल्या याचिकेत तिने आपल्या मुलीच्या 28 आठवड्यांच्या गरोदरपणाचा गर्भपात करण्याची परवानगी मागितली होती. याचिकेत आईच्या वतीने म्हटले की, तिची मुलगी फेब्रुवारीमध्ये बेपत्ता झाली होती आणि तीन महिन्यांनंतर ती राजस्थानमध्ये सापडली. (Latest News)

जिथे एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुलगीही तिच्या कुटुंबाकडे परतली होती.

High Court News
Mumbai Political News : 'निर्लज्जपणाचा कळस; वांद्रे येथील शाखा पाडण्याचे आदेश 'वर्षा'वरुनच आले', संजय राऊतांचा आरोप

डॉक्टर काय म्हणाले?

मुलीची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं की, अल्पवयीन मुलीचा गर्भपात झाला तरी मूल जिवंत जन्माला येईल. त्यामुळे मुलीची नैसर्गिक प्रसूती होणे चांगले आहे. यानंतर, मुलीची इच्छा असल्यास, मुलाला ती तिच्याकडे ठेवू शकते किंवा अनाथाश्रमाला देऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत मूल जिवंत जन्माला येईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. (Crime News)

High Court News
Pune Crime News: धक्कादायक! पुण्यात ५०० रुपयांसाठी राडा; तलवार घेवून घरात शिरला अन्...

नैसर्गिक प्रसुतीला फक्त 12 आठवडे उरले असताना, बाळाचे आरोग्य आणि विकास देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या 12 आठवड्यांत बाळाचा पूर्ण विकास होईल. यानंतर, मूल कोणीतरी दत्तक घेण्याची देखील शक्यता असते, असेही न्यायालयाने म्हटले आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने गर्भपाताच्या परवानगीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com