Mumbai- Goa Highway Latest Update: मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठा निर्णय, गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी

Mumbai- Goa Highway Latest Update: मुंबई-गोवा महामार्गावर उद्या २७ ऑगस्ट ते गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.
Raigad Breaking News Minister Ravindra Chavan and Mumbai Goa highway
Raigad Breaking News Minister Ravindra Chavan and Mumbai Goa highwaySaam TV
Published On

सुरज मसुरकर

Mumbai- Goa Highway Latest Update:

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर उद्या २७ ऑगस्ट ते गणेशोत्सव होईपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

आगामी गणेशोत्सव होईपर्यंत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खड्डे मुक्त करण्यासाठी सध्या मुंबई गोवा महामार्गावर काम जलद गतीने सुरू आहे. त्यामुळे अवजड वाहनांना बंदी घातली आहे. यामुळे वाहन चालकांनी पर्यायी महामार्गाचा वापर करावा, असं आव्हान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले

Raigad Breaking News Minister Ravindra Chavan and Mumbai Goa highway
Beed Ajit Pawar Sabha: अजित पवारांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज; सभेची तयारी पूर्ण, बघा कशी आहे व्यवस्था?

वाहतुक नियंत्रण अधिसुचनेनुसार, गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात असते. त्यात मुंबई-गोवा महामार्गावर रस्ता बनविण्याचे काम चालू आहे.

गणेशोत्सव काळात भाविकांना चांगला रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे या मार्गावरून जाणारी अवजड वाहतूक गणेशोत्सव होईपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या दिवसात अवजड वाहन चालकांना पर्यायी मार्गांनी वाहतूक करावी लागणार आहे.

Raigad Breaking News Minister Ravindra Chavan and Mumbai Goa highway
Ajit Pawar Baramati Sabha: 'मी सत्तेसाठी हपापलेलो नाही', बारामतीतील सभेत अजित पवार कडाडले...

तत्पूर्वी, मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १२ वर्षांपासून रखडलं आहे. गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने जोरदार तयारी केली आहे. त्याकरिता CBT हे नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. तसेच रवींद्र चव्हाण यांनी याच महिन्यात चव्हाण यांनी दोनवेळा महामार्गाच्या कामाची पाहणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com