Ajit Pawar Baramati Sabha: ''मी सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्ता येते जाते. कोणीही ताम्रपट घेऊन जन्मला आलेलं नसतं. पण मिळालेल्या संधीच सोन करायचं असतं'', असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर आले आहेत. बारामतीत दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.
चांद्रयान-३ चा उल्लेख करत अजित पवार म्हणाले की, ''भारत आता जगातील चौथी अंतराळ शक्ती ठरली आहे. इस्रोच्या सगळ्या वैज्ञानिकाचे हे यश आहे. आपल्या राज्यातील काही जणांचा त्यात सहभाग होता, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन.'' (Latest Marathi News)
मोदींच्या कामांचं केलं कौतुक
ते म्हणाले, जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. देश प्रगती पथावर जाण्यासाठी पंतप्रधान यांनी काम केलं. मी मागे काही मोदी यांच्यावर टीका केली होती, अनेक सभा घेतल्या. पण आता अनेक रस्त्यांची कामं आपण पाहतोय.
अजित पवार म्हणाले, पुर्वी बारामती मधील वाहने आणि आताची वाहने यात फरक आहे. बारामतीकरांनाना आता चांगल्या सुविधा देण्यासाठी काम सुरू आहे. अनेक योजना पंतप्रधान यांच्या माध्यमातून येत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.