
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा.
पालघर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने पाऊल उचलले.
राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातलाय. मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडतोय. आता मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यापार्श्वभूमीवर पालघर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या पावसाचा देण्यात आलेला इशार लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. पालघर जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलीय.
पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी याबाबत आदेश दिलाय. पालघर जिल्ह्यात उद्यादेखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे नागरिकांना आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थी, शिक्षक तसेच शालेय कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, हवामान विभागाने वर्तविलेल्या संभाव्य पावसाची परिस्थिती व आज निर्माण झालेला पुराचा धोका लक्षात घेता, 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. यासंबंधीचा अधिकृत आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. सर्वांनी आवश्यक ती काळजी घ्यावी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात 28 सप्टेंबर रोजी गडगडाटासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या पत्रात, सर्व विभागांना आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार काम करण्यास निर्देश देण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.