Nagpur News: नागपुरात मुसळधार पावसाचा कहर; पुराच्या पाण्यात लोक गेले वाहून; आतापर्यंत तिघांचे मृतदेह सापडले

Three Dead Bodies Found In Flood Water Nagpur: नागपूरध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तीन व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. आजही विदर्भाला जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.
नागपुरात मुसळधार पावसाचा कहर
Nagpur NewsSaam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

राज्याच्या उपराजधानीमध्ये वरुणराजाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे विविध ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालीय. तर शहरात शनिवारी २० जुलै २०२४ रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे काही लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचं समोर आलं होतं. आता यामधील तिघांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती मिळतेय.

काय आहेत घटना?

नागपूर शहरात अतिवृष्टीमुळे तीन व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या (Nagpur Rain) होत्या. त्यापैकी दोन व्यक्तींचे मृतदेह हाती लागले आहेत. भोजराज बुलीचंद पटले, अशी एका मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. श्यामनगर पुनापूर भागातील भोजराज बुलीचंद पटले हे नाल्याच्या बाजूने उभे होते. तेव्हा अचानक त्यांचा पाय घसरुन ते नाल्यात पडले अन् पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेले. आता त्यांचा मृतदेह सापडला आहे.

पुरात वाहून गेले...

तर दुसरा मृतदेह १२ वर्षीय श्रावण विजय तुळसिकर नावाच्या मुलाचा (Nagpur News) आहे. ही घटना भरतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. मोहनबाबा नगर परिसरात १२ वर्षीय श्रावण नाल्याच्या बाजूला खेळत होता. तेव्हा नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहाने तो वाहत गेला. त्याचाही मृतदेह सापडला आहे.

तिसरी घटना बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या नरेंद्र नगर भागातील श्रीहरी सोसायटीमधील आहे. सुधा विश्वेश्वरराव वेरुळकर या बेलतरोडी ते बेसा लगतच्या नाल्याचा पूर पाहण्याकरिता गेल्या (Heavy Rain In Nagpur) होत्या. तेव्हा पाण्याच्या प्रवाहाने त्या वाहून गेल्या. श्यामनगर परिसरातील नाल्यातून त्यांचा मृतदेह काढण्यात आलाय. सुधा मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळतेय.

नागपुरात मुसळधार पावसाचा कहर
Nagpur Rain News: नागपुरातील सर्व शाळांना आज जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर!

आजही मुसळधार पावसाचा इशारा

पूर्व विदर्भात आज देखील हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला (Flood Water) आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर शाळा अन् कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलीय. जिल्हाधिकाऱ्यांनी आज चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली येथील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलीय. नागपुरातील पावसाच्या परिस्थितीनंतर जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी हा निर्णय घेतलाय.

नागपुरात मुसळधार पावसाचा कहर
Nanded Flood Video: नाल्याच्या पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची मानवी साखळी करत सुटका; व्हिडीओ समोर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com