Buldhana : ढगफुटीसदृश पाऊस; मिसाळवाडी धरण भरलं, शेतीपिके पाण्याखाली

गेले दाेन ते दिवस झाले बुलढाणा जिल्ह्यास पावसानं झाेपडलं आहे.
buldhana, chikhali, rain, farm
buldhana, chikhali, rain, farmsaam tv
Published On

बुलढाणा : चिखली तालुक्यातील मिसाळवाडी-पिंपळवाडी, शेळगाव आटोळ परिसरात ढगफुटीसदृश धुव्वाधार पाऊस (rain) झाला. या पावसाने मिसाळवाडी नदीला महापूर आला असून, मिसाळवाडी धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहात आहे. या पावसामुळे शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. (Buldhana Rain Update)

अनेक शेतात पाणी साचल्याने पिके वाया गेली आहेत. धुव्वाधार सुरु झालेल्या या पावसाने मिसाळवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे नदीला पूर आला असून, नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

buldhana, chikhali, rain, farm
Maharashtra : इकडं मंत्रिमंडळ विस्तार; तिकडं काॅंग्रेसचा विराेधी पक्षनेते पदावर दावा

त्यामुळे मिसाळवाडी गावाचा संपर्क तुटला होता. तर अनेक शेतकरी शेतात-रानात अडकून पडले होते. या पावसाने जीवितहानी झाली नसली तरी, शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतात उभे असलेले सोयाबीन व इतर पिकांची नासाडी झाली असून, शेतकर्यां चे अतोनात नुकसान झाले आहे..

Edited By : Siddharth Latkar

buldhana, chikhali, rain, farm
Maharashtra Rain : मुंबईसह राज्याला पावसानं झाेडपलं, वाचा कूठं काय घडलं
buldhana, chikhali, rain, farm
Amravati : अमरावतीत १ लाख ९९ हजार हेक्टर शेतीचं नुकसान; संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 250 काेटींचा फटका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com