महाराष्ट्रातील पुणे (Pune) आणि नागपूरसह (Nagpur) अनेक भागात ढगाळ वातावरण निर्मण झाले आहे. त्यामुळे पारा घसरला असून तापमानात काहीशी घट झाली आहे. तर दुसरीकडे राज्यातील इतर भागात हवामान कोरडे असून तापमानाचा पारा वाढला आहे. अशा परिस्थितीत 26 ते 28 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये मंगळवारी हवामान कसे असेल ते जाणून घेऊया. (Heat Wave Latest Marathi News)
हे देखील पाहा -
मुंबई
मंगळवारी मुंबईत कमाल तापमान 37 तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 117 वर नोंदवला गेला.
पुणे
पुण्यात कमाल तापमान 40 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि विजांच कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 106 वर नोंदवला गेला आहे.
नागपूर
नागपुरात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. नागपुरात हलके ढग असतील. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 54 आहे, जो 'समाधानकारक' श्रेणीत येतो.
नाशिक
नाशिकमध्ये कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'समाधानकारक' श्रेणीत आहे.
औरंगाबाद
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथेही हवामान स्वच्छ राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.