Mahabaleshwar News : महाबळेश्वर, पाचगणीतील नागरिक, पर्यटकांचं आरोग्य धोक्यात; गोखले इन्स्टिट्यूटचा धक्कादायक अहवाल

Mahabaleshwar Health News Update :महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक हे वेण्णा लेक भागात घोडे सफरीचा आनंद घेत असतात. मात्र या घोड्यांमुळे सध्या महाबळेश्वर आणि पाचगणी भागात एक समस्या निर्माण झाली आहेत.
Mahabaleshwar News :
Mahabaleshwar News : Saam TV

Mahabaleshwar News :

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) घोडेस्वारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णा लेकजवळ पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या घोडे सफारीमुळे (Horse Riding) वेण्णा लेक तलावात घोड्यांची विष्ठा जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरत असल्याचे एका अभ्यासातून समोर झाले आहे.

या तलावातून महाबळेश्वरसह पाचगणी परिसरालला सुद्धा पाणी पुरवठा होत असतो. पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेने परीक्षण केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. या भागातील घोड्यांची विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने अतिसार,विषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड असे आजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahabaleshwar News :
Mumbai News: मुंबईत वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कॅब चालकांकडून वसूल केला 19.76 लाखांचा दंड

महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक हे वेण्णा लेक भागात घोडे सफरीचा आनंद घेत असतात. मात्र या घोड्यांमुळे सध्या महाबळेश्वर आणि पाचगणी भागात एक समस्या निर्माण झाली आहेत. या भागातील महाबळेश्वर, पाचगणी भागात पर्यटकांना अतिसार, श्वसनाचा तीव्र संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांत मिसळत असल्याने या भागातील नागरिकांना गंभीर आजार होत असल्याचे दिसून आले.  (Latest Marathi News)

Mahabaleshwar News :
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी होणार पूर्ण? मुख्यमंत्र्यांनी थेट डेडलाईन सांगितली

वेण्णा लेकचा पाण्यात E COIL आणि COLIFORM BACTERIA हे संसर्गजन्य विषाणू सापडल्याचे समोर आले आहे. या विषाणूमुळे महाबळेश्वर पाचगणीमधील नागरिकांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com