- राजेश भोस्तेकर
रायगड : महाड एमआयडीसी (Mahad MIDC) हि प्रदुषणासाठी बदनाम आहे. मागील महिन्यात येथे प्रदुषणाने कहर केला असून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये प्रदुषित पाणी मिसळले होते. यामुळे महाड (Mahad) एमआयडीसी क्षेत्र, 24 गाव आणि महाड शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याची नामुष्की महाड एमआयडीसीवर आली होती.
हे देखील पहा :
प्रदूषित पाण्याचा बांध घालून हा पाणी पुरवठा (Water Supply) सुरु करण्यात आला असला तरी टेमघर नाल्यातील प्रदुषित पाणी काढण्यात एमआयडीसीला यश आले नाही. प्रदूषणाचा (Pollution) हा प्रश्न कायम असताना काल संध्याकाळी देशमुख कांबळे परीसरात चेंबर ओव्हर फ्लो होऊन प्रदूषित पाणी दुथडी भरून नाल्यातून वाहत असल्याचे चित्र महाड एमआयडीसी मध्ये दिसले. प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकरणी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आले.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.