Chikhaldara Picnic Spot : चिखलदऱ्यात तुफान राडा, पर्यटकांना जिप्सी चालकाची बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Chikhaldara News : चिखलदऱ्यातील पंचबोल पॉईंटवर काही पर्यटकांचा गाण्यावरून वाद झाल्याने जिप्सी चालकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून वाद वाढल्याने पर्यटकांनी झाडीत लपून जीव वाचवला.
Chikhaldara News
Chikhaldara Picnic Spot Saam Tv
Published On
Summary
  • पंचबोल पॉईंटवर पर्यटकांवर जिप्सी चालकांचा हल्ला; गाण्यावरून वादात बदल

  • सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; पर्यटकांनी झाडीत लपून जीव वाचवला

  • एपीआय प्रवीण पाटील यांच्या वेळीच कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला

  • स्थानिक प्रशासनाने पर्यटन स्थळांवर बंदोबस्त वाढवण्याचे निर्देश दिले

विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात पर्यटकांची सध्या मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. निसर्गाच्या सान्निध्यात थंड हवामानाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करत आहेत. मात्र, या पर्यटन स्थळी घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चिखलदऱ्यातील प्रसिद्ध पंचबोल पॉईंटवर काही पर्यटक एकत्र येऊन गाण्याचा आनंद घेत होते. याच दरम्यान, गाण्याच्या आवाजावरून पर्यटकांमध्ये वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की त्यामध्ये जिप्सी चालकांनी हस्तक्षेप करत काही पर्यटकांना मारहाण केली. पर्यटकांना बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या मारहाणीच्या घटनेनंतरही प्रकरण शांत झाले नाही. जिप्सी चालकांचा एक गट पुन्हा पंचबोल पॉईंटवर जमून त्या पर्यटकांचा पुन्हा पाठलाग करून मारहाण करण्याच्या तयारीत होता. पर्यटकांनी घाबरून जवळच्या झाडीत लपून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पर्यटन स्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.

Chikhaldara News
Chikhaldara Waterfall : विदर्भातील नंदनवनाचं सौंदर्य आणखी खुललं

दरम्यान, चिखलदरा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच एपीआय प्रवीण पाटील यांनी तात्काळ पावले उचलली. आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी घटनास्थळी धाव घेत पर्यटकांची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले असून जिप्सी चालकांविरोधात संबंधित कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाने पंचबोल पॉईंटसह इतर प्रमुख पर्यटनस्थळी अतिरिक्त बंदोबस्त वाढवण्याचे संकेत दिले आहेत. चिखलदऱ्यासारख्या संवेदनशील पर्यटनस्थळी अशा प्रकारची गुन्हेगारी वृत्तीची घटना घडणे अत्यंत दुर्दैवी मानली जात आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, स्थानिक प्रशासनाकडून या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

Chikhaldara News
Chikhaldara : वीकेंडसाठी नवे आदेश, चिखलदऱ्यासाठी पर्यायी मार्ग | VIDEO

जिल्हा प्रशासनाने पर्यटन क्षेत्रात कार्यरत स्थानिक वाहनचालक, गाईड व व्यावसायिकांसाठी आचारसंहिताही लागू करण्याचा विचार सुरु केला आहे, जेणेकरून पर्यटकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही आणि चिखलदऱ्याचे पर्यटन वैभव टिकून राहील. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पर्यटकांच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, अशी मागणी होत आहे.

Q

चिखलदऱ्यात पर्यटकांवर हल्ला कसा झाला?

A

पंचबोल पॉईंटवर गाण्यावरून वाद झाला आणि त्या वादात जिप्सी चालकांनी हस्तक्षेप करत पर्यटकांना मारहाण केली.

Q

या घटनेनंतर पर्यटकांनी काय केले?

A

जीव वाचवण्यासाठी पर्यटकांनी जवळच्या झाडीत लपून बसण्याचा प्रयत्न केला.

Q

पोलीस कधी पोहोचले?

A

घटनेची माहिती मिळताच एपीआय प्रवीण पाटील सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि पर्यटकांची सुटका केली.

Q

प्रशासनाने पुढील काय पावले उचलली आहेत?

A

पंचबोल पॉईंटसह इतर पर्यटनस्थळी बंदोबस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले असून चालक, गाईडसाठी आचारसंहिता लागू करण्याचा विचार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com