Chikhaldara : वीकेंडसाठी नवे आदेश, चिखलदऱ्यासाठी पर्यायी मार्ग | VIDEO

Heavy Tourist Rush in Chikhaldara Prompts Traffic Diversions : चिखलदरा पर्यटनस्थळी वाढती गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवे वाहतूक मार्ग लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

चिखलदरा या प्रसिध्द पर्यटनस्थळी सध्या पावसाळ्यामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी वाहतूक नियंत्रणासाठी पर्यायी मार्ग लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

परतवाडा मार्गावरुन चिखलदरा जाणाऱ्या पर्यटकांसाठी आळवळणा येथील अरुंद रस्ता वाहतुकीसाठी अपुरा असल्याने प्रशासनाने मार्ग वळवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पर्यटकांची वाहतूक सुलभ होईल तसेच अपघातांचा धोका टळण्यास मदत होईल.

त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी सूचनांचे पालन करावे, असे आहावान करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे चिखलदऱ्याच्या निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा उत्साह कमी न होता, सुरक्षिततेच्या दृष्टीनेही योग्य व्यवस्था सुनिश्चित केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com