Solpaur Crime
Solpaur Crimeविश्वभुषण लिमये

सोलापूर शहरात सात लाखांचा गुटखा जप्त...

किराणा दुकानात गुटख्याची डिलिव्हरी देताना पोलिसांनी आरोपीस पकडले...
Published on

सोलापूर- शहरात मागच्या बऱ्याच दिवसांपासून गुटख्यावर कडक कारवाई केली जात आहे. प्रतिबंधित गुटखा, सुगंधी मसाला इत्यादींवर पोलीस सक्तीने कारवाई करताना दिसत आहेत. सोलापुरातील (Solapur) जोडभावी पेठ पोलीसांनी (Police) सापळा रचून अशीच एक धाड टाकली आहे.

भवानी पेठेत किराणा दुकानात दुचाकीवर दोन इसम दोन पोते गुटखा पोहोचवण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना पकडले त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी अन्य नावे सांगितली. सापळा रचून पोलीसांनी बाकीच्या आरोपींना देखील पकडले आहे.

हे देखील पहा -

हे आरोपी चारचाकी गाडीतून गुटखा पुरवण्याचे काम करत होते. त्यांच्याकडे 10 पोती गुटखा सापडला त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपीच्या घराच्या स्लॅबवर 9 पोती गुटखा सापडला असा एकूण 7 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Solpaur Crime
कधी बॅनर तर कधी पत्रकार परिषदा; कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापलं...

तसेच अतिक पटेल,सोहेल कुरेशी,किराणा दुकानात काम करणारा कामगार नेताजी मोहिते,जावेद बागवा आणि फैजान बागवान अशा पाच आरोपींना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com