

दारूबंदीसाठी ग्रापंचायतीने घेतला पुढाकार..
जयेश गावंडे
जयेश गावंडे
अकोला : अकोल्यातील Akola बोरगाव Borgaon मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दहिगाव गावंडे गावात संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी ग्रामपंचायत ने पुढाकार घेत ठराव घेऊन दारूबंदी केली. गावात दररोज भांडण, तंटे होवून शांतता भंग पावत आहे. दारू बंद करण्यासाठी गत काही दिवसांपासून गावातील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेतला होता. Grapanchayat took initiative for ban on alcohol
या मागणीला अखेर ग्रामपंचायत ने मान्यता देत ठराव घेऊन गाव संपूर्ण दारू बंदी करण्याचा निर्णय घेतला. गावातील अवैैध दारू व वरली मटका बंद करण्यासाठी ग्रामसभा सरसावल्या ग्रामसभेत दारू व वरली मटका बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला. दरम्यान दारुबंदी साठी एका समितीची नेमुणूक करण्यात आली आहे.
हे देखील पहा-
ग्रामसभेत घोषित करण्यात आले की, दारू व वरली मटक्याचा व्यवसाय करणाऱ्यांना नोटीस देऊन बंदीसाठी अंतिम सूचना देण्यात आली. त्यानंतर कारवाई करण्यात येईल. सर्वानुमते ग्रामसभेत नियम लावून दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. तसेच दारूबंदी संघटना स्थापन करण्यात आली.
दारू पासून भावी पिढी दूर राहावी या विचारातून हा निर्णय घेण्यात आला. दहिगाव गावंडे या गावात दारू काढून विकली जाते. त्यावर लवकरच आळा बसावा, अशी ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली. तसेच, ग्रामपंचायत दारू बंदीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, बोरगाव मंजू ठाणेदार यांना दिले. ग्रामसभेला सरपंच जया संजय गावंडे, उपसरपंच ममता विजय गावंडे, सचिव संदीप शिरसाठ यांच्या सह सर्व सदस्य आणि दारु बंदी समितीचे सदस्य उपस्थित होते.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.