

महिला व बाल विकास विभागात ८,६६९ पदांची भरती
२३ वर्षांनंतर मोठा निर्णय घेण्यात आला
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांना मंजुरी
राज्यातील तरुणांसाठी मोठी नोकरीची संधी
नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. लवकरच महिला व बाल विकास विभागात मोठी भरती होणार आहे. तब्बल २३ वर्षांनंतर महिला व बाल विकास विभागामध्ये ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. त्याचसोबत, बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे आणि अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या २ लाख २१ हजार ३२८ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभागाने हा मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महिला व बाल विकास विभागामध्ये तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे. महिला व बाल विकास विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे रद्द करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.
महिला व बाल विकास विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.
मंत्री आदिती तटकरेंनी सांगितले, २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.'दरम्यायन, महिला व बाल विकास विभागामध्ये या सर्व पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. या भरतीअंतर्गत नोकरी मिळवण्याची राज्यातील अनेक तरुण-तरुणींना चांगली संधी असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.