विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज; २ मे ते १२ जूनच्या दरम्यान शाळांना उन्हाळी सुट्या !

शैक्षणिक वर्ष २०२२- २३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत.
Good news students
Good news studentsSaam Tv
Published On

लातूर: शैक्षणिक वर्ष २०२२- २३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत. उन्हाळी (Summer) सुट्या सोमवार २ मे २०२२ पासून सुरू होऊन १२ जून २०२२ पर्यंत राहणार आहे. १३ जून २०२२ रोजी शाळा (schools) सुरू होणार आहेत.

हे देखील पहा-

शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची (Diwali) दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांच्या प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने घेता येऊ शकेल. याउपर, माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यासंबंधी बजावले आहे.

Good news students
सलमान खानची हायकोर्टात धाव; पोलिसांत दाखल FIR रद्द करण्यासाठी याचिका

आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील, असे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी शालेय शिक्षणच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com