मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने तातडीचा दिलासा घेण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्या बॉडीगार्ड बरोबर एका पादचाऱ्यावर हल्ला करुन त्याला धमकावल्या प्रकरणी सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर अंधेरीच्या डीएननगर पोलीस (Police) ठाण्यात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टाने (court) या प्रकरणात आज हजेरीसाठी सलमानला समन्स पाठवले आहे. सलमानच्या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर आज सुनावणी होणार आहे.
हे देखील पहा-
2019 मध्ये एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी मुंबईतील (Mumbai) अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सलमान खानला समन्स जारी करण्यात आले होते. यावर आज सुनावनी निश्चित केली आहे. या समन्समध्ये सलमान बरोबरच त्याच्या अंगरक्षक नवाज शेखला कोर्टासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये रस्त्यावर सायकल चालवत असताना काही जणांनी सलमानचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान सलमानच्या बॉडीगार्डने त्यांचा मोबाईल (Mobile) हिसकावून घेतला. यानंतर सलमानच्या बॉडीगार्डने वाद घालत धमकी दिल्याचा आरोप पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता. पांडे यांच्या तक्रारीवरुन सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाविरोधात भादंवि कलम 504 आणि 506 (धमकावणे), 323 (एखाद्याला इजा करणे), 392 (दरोडा), 506 (गुन्हेगारी प्रवृत्ती), 34 (एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समान हेतू) या कलमांतर्गत डीएननगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर महानगर दंडाधिकारी आर आर खान यांच्यासमोर सुनावणी पार पडली होती. रेकॉर्डवरील सामग्री, पोलिसांचा सकारात्मक अहवाल आणि इतर पुरावे लक्षात घेऊन, आरोपी विरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे कारण असल्याचे न्यायालयाने स्पष्ट करत आरोपींना समन्स जारी करण्यात आले आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.