Good news for farmers PM Kisan Samman Nidhi Yojana 15th installment will be available on 14 November 2023
Good news for farmers PM Kisan Samman Nidhi Yojana 15th installment will be available on 14 November 2023 Saam TV

PM Kisan: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट; खात्यात जमा होणार 'इतके' पैसे, कुणाला मिळणार लाभ?

PM Kisan15th installment: दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार आहे.
Published on

PM Kisan Samman Nidhi Yojana 15th installment

दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ व्या हप्त्याची तारीख ठरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पीएम किसानचा १५ वा हप्ता येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Good news for farmers PM Kisan Samman Nidhi Yojana 15th installment will be available on 14 November 2023
MNS Vasant More: आमची दिवाळी नीट झाली नाही, तर तुमचा रोज शिमगा होईल; वसंत मोरेंचा पोलिसांना इशारा

त्यासाठी सरकारने तयारी सुद्धा केली आहे. शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे. योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

प्रत्येक ४ महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आत्तापर्यंत देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे (PM Kisan Samman Nidhi Yojana) १४ हफ्ते मिळाले आहेत. आता १५ वा हप्ता कधी मिळणार? याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.

येत्या १४ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसानचा १५ वा हप्ता मिळू शकतो. PM किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचे हस्तांतरण करू शकतात. दरम्यान, मागील हप्त्यांमध्ये, पीएम किसानच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून आली होती. त्यामागचे कारण जमिनीच्या नोंदींची पडताळणी तसेच केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते.

त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेतला, अशा शेतकऱ्यांकडून सुद्धा पैसे परत घेण्याची प्रक्रिया सरकारकडून सुरू आहे.

Good news for farmers PM Kisan Samman Nidhi Yojana 15th installment will be available on 14 November 2023
Mumbai Accident News: भरधाव वेगात कार दामटवली, ६ ते ७ वाहनांना उडवले; वरळी सी लिंकवरील अपघाताचा VIDEO समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com