Farmers Compensation Fund: गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; नुकसानभरपाईचा निधी मंजूर, कोणत्या जिल्ह्याला किती मदत?

Farmers Compensation : राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे.
Farmers Compensation Fund
Farmers Compensation FundSaam TV
Published On

Farmers Compensation Fund : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने राज्याला चांगलंच झोडपून काढलं आहे. अवकाळीसह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झाले आहे. दरम्यान, राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे.

Farmers Compensation Fund
Jalna News: शेतकऱ्याचं घर जळालं! आगीत दीड लाखांच्या नोटा जळून खाक; दुचाकी, धान्य, सोनं सगळं गेलं

राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते.

त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला. दिनांक ४ ते ८ मार्च व दि.१६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

Farmers Compensation Fund
NCP Maharashtra News : सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द; निवडणूक आयोगाचा निर्णय

तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मादविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला.

महसुली विभागनिहाय वितरीत करण्यात आलेला निधी असा

अमरावती विभाग २४ कोटी ५७ लाख ९५ हजार, नाशिक विभाग ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, पुणे विभाग ५ कोटी ३७ लाख ७० हजार, छत्रपती संभाजी नगर ८४ कोटी ७५ लाख १९ हजार. एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com