Maharashtra Politics: गोंदियामध्ये भाजपला धक्का! माजी आमदाराने ठोकला पक्षाला रामराम; नाना पटोलेंची घेतली होती भेट

Gondia Politics Breaking News: गोंदिया जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गोंदिया विधानसभेवर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले व सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Gondia Politics Breaking News:
Gondia Politics Breaking News: Saamtv
Published On

शुभम देशमुख, गोंदिया|ता. २१ जून २०२४

गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गोंदिया विधानसभेवर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले व सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Gondia Politics Breaking News:
OBC Reservation: आरक्षणाचा वाद पेटला! लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ राज्यभरात ओबीसी बांधव रस्त्यावर, लातूर, बीडमध्ये रास्ता रोको; पाहा VIDEO

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गोंदिया विधानसभेवर शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले व सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

"माझ्या समर्थकांकडून मला भाजपपासून दुर होण्याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे मी भाजप पासून दुर होत आहे." असे राजीनामा पत्र रमेश कुथे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे.

Gondia Politics Breaking News:
Nashik City Bus Service : नाशिक सिटी लिंक बस सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल; कर्मचा-यांनी पगार थकल्याने पुकारला संप

विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आठवड्या भरापूर्वीच मध्यरात्रीच्या सुमारास रमेश कुथे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अखेर रमेश कुथे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांनी पक्षप्रवेशा संदर्भात अद्याप कुठलीही माहिती दिलेली नाही

Gondia Politics Breaking News:
Nandurbar Accident News: हृदयद्रावक! ट्रक- दुचाकीचा भीषण अपघात; गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत, चालक फरार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com